स्पॉटलाईट

राज्यपालांना सरकारी विमान नाकारलं! वादाचा नवा अंक, वाचा नेमकं काय घडलं?

साम टीव्ही

देहरादूनला निघालेल्या राज्यपालांना राज्य सरकारने सरकारी विमान नाकारल्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद पेटलाय. य़ानिमित्ताने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार या जुन्याच वादाचा नवा अंक सुरू झालाय. 

राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार या जुन्या वादाचा नवा अंक सुरू झालाय. एका कार्यक्रमासाठी मसुरीला निघालेल्या राज्यपालांना सरकारी विमान राज्य सरकारने नाकारलंय. त्यामुळे विरोधकांनी मोठा गहजब केलाय. 

राज्यपाल भगतसिंग कोश्य़ारी मसुरीच्या IAS प्रशिक्षण आकादमीत अधिकारी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी निघाले होते. मात्र राज्यपाल विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल स्पाईस जेटच्या विमानाने रवाना देहरादूनला झाले.

विरोधकांच्या दाव्यानुसार या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल कार्यालयाने 15 दिवसांपुर्वीच नोंदणी केली होती. तर सरकारी दाव्यानुसार राज्यपाल कार्यालयाला बुधवारी संध्याकाळी म्हणजे एक दिवस अगोदरच उड्डाणाला परवानगी नाकारल्याचं कळवलं होतं.
यापुर्वीही महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील नियुक्तीच्या वेळीही राज्यपालांनी अडवणूक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला होता. शिवाय सध्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या सरकारच्या प्रस्तावावरही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष सुरूच असल्याचं चित्र आहे. त्यात आता या आणखी एका वादाची भर पडलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asafoetida water Benefits: गरम पाण्यात हिंग टाकून प्या, होतील गुणकारी फायदे

Today's Marathi News Live : पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Buldana Water Storage : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा

Summer Diet Tips: 'या' ५ पदार्थाचा आहारात करा समावेश; उन्हाळ्यात आजारांपासून राहा दूर

Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याची ६ लाखात फसवणूक; गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष

SCROLL FOR NEXT