स्पॉटलाईट

गॅस वापरताय तर या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी! नाहीतर तुमच्यासोबतही ही घटना घडू शकते...

साम टीव्ही

मुंबईच्या लालबागमध्ये गॅस सिलिंडर स्फोटाची दुर्घटना घडलीय. पण यामुळे महानगरांमध्ये घडणाऱ्या गॅस सिलिंडर स्फोटाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

मुंबईच्या लालबाग इथल्या गणेशगल्ली परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच घरातील 15 जण जखमी झालेत. घराचंही मोठं नुकसान झालं. मात्र या दुर्घटनेमुळे महानगरांमधील वाढत्या सिलिंडर गळतीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. काही दिवसात मुंबई परिसरात गॅस गळतीच्या काही दुर्घटना समोर आल्या होत्या. त्यातच गॅस सिलिंडरच्या स्फोटानं खळबळ माजलीय.

गॅस दुर्घटना होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्याल -

  1. जेथे एलपीजी ठेवायचा आहे ती जागा हवेशीर असावी. तिला समोरासमोर वायुविजन होईल अशी रचना असावी. 
  2. दारेखिडक्या बंद असणा-या खोलीत कधीही एलपीजी वापरू नये.
  3. सिलेंडर, रेग्युलेटरचे बटन आणि रबरी नळी हात पोहोचेल अशा पद्धतीने ठेवलेली असावीत.
  4. सिलेंडरला थेट उन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये.
  5. सिलेंडरच्यावर कोणतेही भांडे, फडके, इत्यादी ठेवू नयेत.

गॅस कंपनीकडून सिलिंडर घरी आला की, आपली जबाबदारी संपली, असा निष्काळजीपणा अनेकवेळा होतो. मात्र सिलिंडरबाबत काळजी न घेतल्यास अनेक दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे तुम्हीही गॅस वापरताना काळजी घ्या.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भिवंडी तालुक्यातील प्लास्टीक कंपनी ला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT