Highest T20I Score Record Zimbabwe team 
Sports

Highest T20I Score Record: झिम्बाब्वेनं टी२०मध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या; तोडला टीम इंडियाचा रिकॉर्ड

T20I Score Record: काही दिवसापुर्वीच हैदराबादमध्ये टीम इंडियाने बांगलादेशाच्या विरुद्धात खेळतांना २९७ धावा केल्या होत्या. हा स्कोअर 20 षटकात केला होता.

Bharat Jadhav

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम झिम्बाब्वे संघाने केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे क्रिकेट संघाने गॅम्बियाविरुद्ध 20 षटकात 344 धावा करत नवा विश्वविक्रम केलाय. काही दिवसांपूर्वी टीम इंडिया 297 धावा करून हा विक्रम करण्याच्या जवळ होती.

केन्याची राजधानी नैरोबीमध्ये टी20 वर्ल्ड कपच्या आफ्रिका सब- रिजनच्या पात्रता सामने खेळले जात आहेत. यात पात्रता सामन्यात झिम्बाव्बे आणि गाम्बियाचा सामना झाला. या सामन्यादरम्यान झिम्बाव्बे संघाने मोठी धावसंख्या उभारली. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली.

ऑलराउंडर सिकंदर रझाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्याने आपला दमदार खेळ करत चौकार आणि षटकाराचा वर्षाव केला. सिकंदरने अवघ्या 33 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. हे T20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वात जलद शतक आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा विक्रम मोडला.

दोघांनी 35 चेंडूत शतके झळकावली. रझाने क्लाईव्ह मदंडेसह 40 चेंडूत 141 धावांची भागीदारी केली आणि संघाला 20 षटकांत 344 धावांच्या विश्वविक्रमी धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. दरम्यान सलामी फलंदाज ब्रायन बेनेट आणि टी मारुमानी या दोघांनी मिळून 5.4 षटकात 98 धावा कुटल्या. मारुमानीने फक्त 19 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. बेनेटने ही 26 चेंडूत 50 धावा केल्या.

दरम्यान झिम्बाब्वेने 344 धावा करत गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळने केलेला 314 धावांचा विश्वविक्रम मोडला. तर पूर्ण सदस्य देशांमध्ये हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता, टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध 297 धावा केल्या होत्या.

षटकारांचा विक्रम

झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजांनी या सामन्यात षटकारांचा लपाऊस पाडला. कर्णधार सिकंदर रझाने सर्वात जास्त 15 षटकार मारलेत. तर 7 चौकार मारलेत. त्यानंतर17 चेंडूत 55 धावा करणारा मडांडेने 5 षटकार मारलेत. तर मारुमणीने 4 षटकार ठोकले. एकूणच या डावात झिम्बाब्वेने 27 षटकार मारले. यात या संघाने नेपाळने केलेला षटकारांचा विक्रमही मोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT