sikandar raza  twitter
क्रीडा

Sikandar Raza: टी-20 क्रिकेटचा नवा सिकंदर! अवघ्या इतक्या चेंडूत झळकावलं सर्वात वेगवान शतक

Sikandar Raza Fastest Century In T20I Cricket: झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रझाने टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Sikandar Raza Fastest Century In T20I Cricket: झिम्बाब्वे आणि गांजिया यांच्यात झालेला टी -२० सामना ऐतिहासिक ठरला आहे. या सामन्यात एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने रेकॉर्डब्रेक धावसंख्या उभारली.

जितक्या धावा वनडे क्रिकेटमध्येही करताना घाम फुटतो, तितक्या धावा या संघाने टी -२० सामन्यात करून दाखवल्या आहेत. ही धावसंख्या उभारण्यात झिम्बाब्वेच्या ३ फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. एकाने सर्वात वेगवान शतक झळकावलं तर इतर दोघांनी वेगवान अर्धशतकं झळकावली.

रोहितचा रेकॉर्ड मोडला

या सामन्यात सर्वात वेगवान शतक झळकावणारा सिकंदर रझा ८ व्या षटकात फलंदाजीला आला. त्यापूर्वीच झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी ७ षटकात ११५ धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानावर सिकंदर रझाचं वादळ आल.

त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढील १३ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह अवघ्या ३३ चेंडूत त्याने टी -२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं.

यापूर्वी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांच्या नावावर होता. या दोघांच्या नावे ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावण्याची नोंद आहे. त्याने ४३ चेंडूंचा सामना करत १३३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ षटकार आणि ७ चौकार खेचले.

असा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

सिकंदर रझा हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या शतकी खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने टी -२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेने या डावात ३४४ धावा केल्या. या धावांचा बचाव करताना हा सामना २९० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: जास्त भात खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम

Maharashtra News Live Updates: शहराचा अख्खा विचका झालाय; राज ठाकरेंची टीका

Maharashtra Election : शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? मुंबईचा आखाडा तापणार, मैदानासाठी ठाकरे गट-मनसेनं दंड थोपटले

Maharashtra Election: ५० बंडखोरांमुळे महायुती-मविआ चिंतेत; काहींनी मित्रपक्ष तर काहींनी आपल्याच पक्षाविरोधात थोपटले दंड

Viral News : स्पर्धा संपली, मैदानावरच फोनवर बोलता बोलता खाली कोसळला; खेळाडूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, VIDEO

SCROLL FOR NEXT