team india yandex
Sports

Team India Bowling Coach: विनय कुमार नव्हे तर या 2 खेळाडूंची नावं बॉलिंग कोचसाठी चर्चेत; BCCI ने केली शिफारस

Zaheer Khan: गौतम गंभीरने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमारच्या नावाची शिफारस केली आहे. दरम्यान बीसीआयने आणखी २ खेळाडूंची नावं सुचवली आहेत.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान गौतम गंभीरसमोर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी टी-२० वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकून देण्याचं आव्हान असणार आहे.

गौतम गंभीर हा भारतीय संघाचा २५ वा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. भारतीय संघात हेड कोच म्हणून एन्ट्री करताच गौतम गंभीरने काही अटी ठेवल्या होत्या. यानुसार, त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशिक्षक निवडण्याचे हक्क हवे होते. माध्यमातील वृत्तानुसार, त्याने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमारच्या नावाची शिफारस केली होती.

बीसीसीआयच्या सुत्राने टाइम्स नावला दिलेल्या माहितीत सांगितले की, अभिषेक नायरचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून समावेश करण्यावर बीसीसीआय ग्रीन सिग्नल देऊ शकते. मात्र विनय कुमारचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून समावेश करण्यावर बीसीसीआय नकार देऊ शकते. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान किंवा लक्ष्मीपती बालाजीची निवड करु शकते. जहीर खानने गेली बरीच वर्ष मुंबई इंडियन्स संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्सची भूमिका बजावली आहे. लक्ष्मीपती बालाजीला चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे.

भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि सिराजसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. तर हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि तुषार देशपांडेसारखे नवखे गोलंदाज आहेत. या नवख्या गोलंदाजांना उत्तम मार्गदर्शकाची गरज आहे. यासाठी जहीर खान किंवा लक्ष्मीपती बालाजी हे उत्तम पर्याय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT