Yuzvendra Chahal Bowling In County Championship Twitter
क्रीडा

Yuzvendra Chahal Bowling: चहलचा शेन वॉर्न अवतार! बॉल ऑफ द सेंच्युरीपेक्षा जास्त फिरवला चेंडू; VIDEO पाहायलाच हवा

Ankush Dhavre

Yuzvendra Chahal Bowling Video:

आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी जाहिर करण्यात आलेल्या संघात युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलं गेलं नाहीये. त्यामुळे युजवेंद्र चहलने इंग्लंडची वाट धरली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत त्याने केंट संघासाठी पदार्पण केलं आहे.

चहलने आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. त्याची धारदार गोलंदाजी काउंटी क्रिकेट स्पर्धेतही पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिला विकेट घेताच त्याने क्रिकेट चाहत्यांना शेन वॉर्नची आठवण करून दिली आहे.

चहलच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहलचा चेंडू टप्पा पडताच इतका फिरला की फलंदाजाला काही कळायच्या आत ऑफ स्टंप उडवून गेला. चहलचा चेंडू शेन वॉर्नसारखाच फिरला. जेव्हा शेन वॉर्न गोलंदाजी करायचा त्यावेळी देखील त्याच्या फिरकीचा सामना करायला फलंदाज थरथर कापयचे.

काउंटी क्रिकेटमध्ये घेतला पहिला विकेट..

युजवेंद्र चहल हा आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. पहिल्याच डावात त्याने केंट संघासाठी आपला पहिला विकेट घेतला आहे. नॉटिंघमशायर संघाविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत २० षटके टाकून ३ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

युजवेंद्र चहलची कामगिरी..

युजवेंद्र चहलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत भारतीय संघासाठी ७२ वनडे आणि ८० टी -२० सामने खेळले आहेत. ७२ वनडे सामने खेळताना त्याने २७.१२ च्या सरासरीने १२१ गडी बाद केले आहेत. तर ८० टी-२० सामन्यांमध्ये २५.०९ च्या सरासरीने ९६ गडी बाद केले आहेत. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: फ्लाईंग Richa Ghosh! वाऱ्याच्या वेगाने डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDE0

Marathi News Live Updates : दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊसाच्या सरी

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT