yuvraj singh is unhappy with mumbai indians decision said rohit sharma kept captain in one more ipl season amd2000 saam tv news
Sports

Yuvraj Singh On Rohit Sharma: 'रोहितच कॅप्टन हवा होता..', हार्दिकला कॅप्टनसी देण्याच्या निर्णयावर युवराज सिंग नाराज

Yuvraj Singh On Mumbai Indians Captaincy: मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयावरुन क्रिकेट फॅन्ससह दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील आपलं मत मांडलं आहे.

Ankush Dhavre

IPL 2024, Yuvraj Singh On Rohit Sharma:

आयपीएल २०२४ स्पर्धेचं आगामी हंगाम अतिशय खास असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. मात्र तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी त्याला गुजरात टायटन्स संघातू ट्रेड करण्यात आलं होतं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.

मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयावरुन क्रिकेट फॅन्ससह दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील आपलं मत मांडलं आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध रंगणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यावेळी फलंदाज म्हणून खेळताना दिसून येणार आहे. या निर्णयावरुन युवराज सिंगचं म्हणणं आहे की, रोहितला आणखी एक हंगामात मुंबईचं नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी होती. (Cricket news in marathi)

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना युवराज सिंग म्हणाला की,' रोहित शर्माने कर्णधार म्हणून ५ वेळा जेतेपद पटकावलं आहे. त्याला कर्णधारपदावरुन काढणं हा मोठा निर्णय होता. तुम्ही जरी नवीन खेळाडूला संघात स्थान देताय,जसं हार्दिक पंड्या संघात आला आहे. तरीदेखील मी त्याला आणखी एका हंगामात संघाचं नेतृ्त्व करण्याची संधी दिली असती. तर हार्दिक पंड्याला मी संघाचं उपकर्णधारपद दिलं असतं आणि संघातं कामकाज कसं चालतंय हे पाहू दिलं असतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' जर मी संघाच्या दृष्टीने विचार केला, तर ते भविष्याचा विचार करत आहेत. मात्र रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करतोय. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं की, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. संघाने भविष्याच्या दृष्टीने विचार केला आहे. आशा करतो की तो चांगली कामगिरी करेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT