Yuvraj Singh
Yuvraj Singh Saam Tv
क्रीडा | IPL

...म्हणून मी २००७ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार झालो नाही; युवराज सिंगने केला खुलासा

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा माजी फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याने इग्लंड विरुध्दच्या सामन्यात मारलेले सलग सहा षटकार तर आपल्याला माहित आहेतच. आता युवराजने त्याच्या क्रिकेट जीवनातील एक मोठा खुलासा केला आहे. त्याने कर्णधार पदावरुन खुलासा केलाय. '२००७ मध्ये कर्णधार बनणार होतो, पण बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना मला कर्णधार बनवायचे नव्हते. कदाचित त्यामुळेच मला संघाचा कर्णधार होऊ शकता आले नाही. असं युवराज सिंग याने म्हटले आहे. युवराजने महेंद्र सिंह (Mahendra Sinh Dhoni) धोनी बाबतीतही मोठे खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. त्याची ही मुलाखत समालोचक संजय मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रिकेट (Cricket) जीवनातील बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत.

या मुलाखतीत त्याने कर्णधार पदा संबंधी खुलासा केला आहे. 'जेव्हा मला कर्णधार बनायचे होते, तेव्हा ग्रेग चॅपेल यांची घटना घडली होती. त्यावेळी टीम इंडियामधील संपूर्ण वातावरण चॅपेल की सचिन यामध्ये विभागले होते. सचिनला सपोर्ट करणारा मी कदाचित एकमेव खेळाडू होतो. कदाचित हेच बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना आवडले नसेल, असंही युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला.

'हे किती खरे आहे हे मला माहीत नाही. त्यावेळी सेहवाग सीनियर होता, तरीही तो इंग्लंड दौऱ्यात संघात नव्हता. मी एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होतो. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता. द्रविड कर्णधार पदावरुन बाजूला गेल्यानंतर मला कर्णधार बनवायचे होते, पण माहीला कर्णधार बनवण्यात आले, असंही युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला.

युवराज सिंग पुढे म्हणाला, 'काही दिवसानंतर मला वाटले माही कर्णधारपदासाठी खरोखरच चांगला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो कदाचित योग्य व्यक्ती होता. त्यानंतर मला खूप दुखापत होऊ लागली. मी कर्णधार झालो असतो तरी मला संघाबाहेर जावे लागले असते. कारण त्यावेळी जखमांचा माझ्या शरीरावर परिणाम होऊ लागला होता.

'जे होते ते चांगल्यासाठीच होते'. कर्णधार न झाल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. पण मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देईन. मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांच्या बाजूने राहीन, असंही युवराज सिंग म्हणाला.

२००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात संघाचा पराभव झाला होता. यानंतर तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने संघाचे कर्णधारपद हाती घेतले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) विक्रमांच्या बाबतीत यशस्वी कर्णधारांपैकी एक बनला.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Today's Marathi News Live : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

Vangyach Bharit: झणझणीत! अस्सल गावरान वांग्याचं भरीत, खास रेसिपी

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT