female fan cried  twitter
क्रीडा

SRH vs RR, Qualifier 2: राजस्थानचा पराभव पाहून फॅन्स भावुक! तरुणीचा ढसाढसा रडतानाचा Video तुफान व्हायरल

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेची दणक्यात सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला शेवट गोड करता आलेला नाही. हा संघ प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरेल, असं म्हटलं जात होतं. मात्र स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात या संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील क्लालिफायर २ चा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह राजस्थानचा रॉयल्स संघाचा स्पर्धेतील प्रवास इथेच थांबला. तर सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. १७ व्या हंगामातील ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर हैदराबादच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण होतं. तर राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात नैराश्य पसरलं होतं. संपूर्ण हंगामात राजस्थान रॉयल्सच्या फॅन्सने आपल्या संघाला सपोर्ट केला. सामना घरच्या मैदानावर असो किंवा बाहेर असो, राजस्थानचे फॅन्स आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर हजर असायचे. या फॅन्सला अशी आशा होती की, दिर्घ काळाची प्रतिक्षा संपवून राजस्थानचा संघ यंदा ट्रॉफी उंचावणार. मात्र हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे. (Female fan cried after SRH vs RR Match)

तरुणीचा फोटो व्हायरल

या सामन्यानंतर सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो तुफान व्हायरल होतोय. ज्यात राजस्थानच्या पराभवानंतर चिमुकली रडताना दिसून येत आहे. या भावुक करणाऱ्या फोटोवर नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाची संघमालक काव्या मारन जल्लोष साजरा करताना दिसून आली. तिचा जल्लोष साजरा करत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकअखेर ९ गडी बाद १७५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी बाद १३९ धावा करता आल्या. राजस्थानला हा सामना ३६ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT