Virat Kohli interview Gautam Gambhir saam tv
Sports

Virat-Gambhir Interview Video: माझ्यापेक्षा जास्त तू भांडतोस...; कोहलीच्या प्रश्नावर गंभीरचं थेट उत्तर, विराट गंभीरच्या हाई वोल्टेज इंटरव्यूचा ट्रेलर रिलीज

Virat Kohli interview Gautam Gambhir: टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी IND vs BAN पहिल्या टेस्टपूर्वी गप्पा मारल्यात. यांच्यातील असलेल्या वादाचा 'मसाला' आताच संपवून टाकूयात असं दोघांनी म्हटलंय.

Surabhi Jayashree Jagdish

Virat & Gambhir Viral Video: उद्यापासून भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली रंगणारी ही पहिली टेस्ट सिरीज आहे. दरम्यान पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक ब्लॉकबस्टर वीडियो शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा हा इंटरव्ह्यू आहे. विराट आणि गंभीर यांच्यामध्ये वाद होते, याची सर्वांना माहिती आहे. मात्र अशातच या दोघांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत बीसीसीआयने चाहत्यांना एक मोठा धक्का दिलाय.

यामध्ये विराट कोहली गंभीरची मुलाखत घेत असून याचा छोटा टीझर शेअर करण्यात आलाय. यामध्ये आता आम्ही एकत्र खूप पुढे आलो आहोत आणि आम्ही सगळा मसाला संपवून टाकला आहे, असं विराटने म्हटलंय.

बीसीसीआयने अजून ही मुलाखत शेअर केलेली नाही. पण त्याचा छोटा व्हिडीओ शेअर केला गेलाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल की ही मुलाखत किती मजेदार असणार आहे. या मुलाखतीत गंभीरने विराट कोहलीच्या 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला. या सिरीजमध्ये विराट कोहलीने उत्तम फलंदाजी केली होती.

काय म्हणाला गौतम गंभीर?

गौतम गंभीर म्हणतो की, मला अजून आठवतं की, तुझ्यासाठी ऑस्ट्रेलियाची सिरीज धमाकेदार ठरली होती. या सिरीजमध्ये तू खूप चांगला खेळला होता. या दौऱ्यात तुम्ही वेगळ्या झोनमध्ये होता. माझ्यासाठी असंच काहीसं नेपीयरमध्ये झालं होतं, तेव्हा मी अशाच झोनमध्ये होता. पण ज्यावेळी मी मागे वळून पाहतो तेव्हा मी विचार करतो की मी दोन-अडीच दिवस खेळू शकलो असतो का? मला वाटत नाही की, मी तशी कामगिरी पुन्हा करू शकलो.त्यामुळे त्यानंतर मी आयुष्यात पुन्हा त्या झोनमध्ये गेलो नाही.

कशी होती विराटची कामगिरी?

विराट कोहलीने 2014-15 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार टेस्ट सामन्यांच्या आठ डावांमध्ये 86.50 च्या सरासरीने एकूण 692 रन्स केले होते. 2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यात नेपियरमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धोका होता. मात्र गौतम गंभीरने दुसऱ्या डावात 436 चेंडूत 137 रन्स केले होते. यावेळी टीम इंडियावरचा पराभव टळला होता. गंभीरने या मुलाखतीत याच आठवणींना उजाळा दिलाय.

वादाच्या मुद्यावर काय म्हणाले गंभीर-कोहली

विराट आणि गंभीर यांच्यातील वाद प्रत्येकाला माहिती आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरूद्ध भिडले होते. यावेळी विराट कोहलीने गंभीरला विरोधी संघाशी होणाऱ्या शाब्दिक बाचाबाचीबद्दल विचारलं. विराट म्हणाला, अशावेळी तुझं लक्ष विचलीत झालं का किंवा त्यामुळे तू अधिक प्रेरित होऊन चांगली खेळी केलीस का?

या प्रश्नावर गंभीरने विराटचीच फिरकी घेतली. यावेळी गंभीरने या दोघांमधील वादाचा उल्लेख केला आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसू लागले. गौतम म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर तू माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकतोस. माझ्यापेक्षा मैदानावर तुझीच जास्त भांडणं होतात. याला प्रत्युत्तर देत विराट म्हणाला, माझ्या या मतावर कोणीतरी सहमत होईल हे शोधतोय. मी म्हणत नाही की हे चूकीचं आहे, पण कुणीतरी म्हणेल की, असंच होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT