Rohit sharma saam tv
क्रीडा

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Rohit sharma: ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड मैदानावर ३६ रन्सवर ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडिया ४६ रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान यावेळी आपला एक निर्णय चुकला असल्याचं टीमचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं आहे.

Surabhi Jagdish

बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर न्यूझीलंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. पहिल्या दिवशी पावसाने खेळ केल्यामुळे दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. मात्र १७ ऑक्टोबर रोजी या मैदानावर जे घडलं ते कदातिच टीम इंडियाचे चाहते विसरू शकणार आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडच्या मैदानावर ३६ रन्सवर ऑलआऊट झाल्यानंतर पुन्हा गुरुवारी टीम इंडिया ४६ रन्सवर ऑलआऊट झाली.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजाची शरणागती पत्करली. दरम्यान या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडियाने केलेल्या खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माची तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये रोहित शर्माने आपला एक निर्णय चुकला असल्याचं कबूल केलं.

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीमसाठी फार धोकादायक ठरला. यावेळी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सिझनमध्ये टीम इंडिया अवघ्या 46 रन्समध्ये गडगडली. आघाडीच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

खराब कामगिरीनंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

टीम इंडियाच्या या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी का निवडली नाही याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावेळी अखेर दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहित स्वत: पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनीही रोहितला हाच प्रश्न विचारला. यावेळी रोहितने सांगितलं की, पीच समजून घेण्यामध्ये आपली चूक झाली होती. पीच सपाट असेल असं वाटलं कारण त्यावर जास्त गवत दिसत नव्हतं. त्यामुळे मी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहितच्या म्हणण्यानुसार, त्याच्या चुकीमुळे टीम इंडिया या परिस्थितीत अडकलीये. त्याने 46 रन्सवर ऑलआऊट होणं हे दुःखद आहे. याचं कारण म्हणजे हे माझ्या चुकीमुळे घडलंय. वर्षभरात अजूनही एक-दोन चुका होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT