Year Ender 2021: खेळाच्या मैदानातील वादंग; 'हे' हिरो ठरले व्हिलन Saam TV
क्रीडा

Year Ender 2021: खेळाच्या मैदानातील वादंग; 'हे' हिरो ठरले व्हिलन

भारतातही खेळाडू वादात सापडले होते. गेल्या वर्षामध्ये, कोणत्या घटनांनी खेळाची प्रतिमा मलिन केली ते जाणून घेवूया.

वृत्तसंस्था

2021 मध्ये क्रीडा क्षेत्रात अनेक अनोख्या घटना घडल्या. भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्स, वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणे, पॅरालिम्पिकमधील यश, हॉकीचा पुन: उदय या सर्वांचा समावेश आहे. मात्र यंदा खेळाशी संबंधित अनेक वाद देखील झाले. त्याने खेळाची प्रतिमा मलीन केली. भारतातही खेळाडू वादात सापडले होते. गेल्या वर्षामध्ये, कोणत्या घटनांनी खेळाची प्रतिमा मलिन केली ते जाणून घेवूया.

Mohammed Siraj

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्याला वाईट शब्दात हिणवले होते. दुखापतग्रस्त खेळाडूंशी झुंज देऊनही भारतीय संघ कसोटी मालिकेदरम्यान जबरदस्त खेळ दाखवत असताना हा प्रकार घडला होता. दरम्यान, सिराजवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली. यामुळे पुन्हा क्रिकेटची प्रतिमा खराब झाली. परदेशात भारतीय खेळाडूंशी यापूर्वी अनेकदा गैरवर्तन झाले असून त्यांच्यावर वाईट कमेंटही केल्या गेल्या आहेत. सिराजच्या प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाई करत काही प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून दिले. ही घटना जानेवारी 2021 ची आहे.

Sushil Kumar

ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा सुशील कुमार (Sushil Kumar) भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. पण 2021 साली सुशील कुमारची प्रतिमा डागाळली. सहकारी कुस्तीपटूच्या खून प्रकरणात सुशील कुमारचे नाव पुढे आले आणि त्याला तुरुंगात जावे लागले. 23 वर्षीय सागर धनखरला छत्रसाल स्टेडियमवर बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुशील कुमारचे नाव पुढे आले. सुमारे 15-20 दिवस पर्यंत फरार झाल्यानंतर सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

Virat Kohli & Saurav Ganguly

विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक आहे आणि सध्या बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष आहे. 2021 मध्ये दोघांमधील वाद खूप चर्चेत आला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कोहलीला वनडे कर्णधारपदावरून वगळण्यात आले होते. यापूर्वी कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडले होते. गांगुलीने सांगितले की, मी कोहलीला T-20 चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. हे कर्णधारपद सोडल्यानंतरच त्याच्यावर एकदिवसीय सामन्यांची जबाबदारीही घेतली गेली कारण T20-ODI मध्ये वेगळे कर्णधार असू शकत नाहीत. पण कोहलीने पत्रकार परिषदेत गांगुलीला टोकले. मला कर्णधार पदावरुन पायउतार होण्यापासून कोणीही रोखले नाही, असे तो म्हणाला. तसेच त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याची माहितीही दीड तासानंतरच देण्यात आली. त्यामुळे भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आले. तसेच, बोर्ड पुन्हा एकदा जबाबदारी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यात अडकले.

Mary Kom

टोकियो ऑलिम्पिकदरम्यान (Tokyo Olympics), ऑलिम्पिक स्पर्धेत महिला बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले बॉक्सिंग पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमसोबत वाद झाला होता. मेरी कोमला स्पर्धेदरम्यान उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण मॅच संपल्यानंतर काही तासांनंतर मेरी कोमने दावा केला की ती मॅच हरली हे तिला माहित नव्हते. तिने दावा केला की कोचिंग स्टाफने तिला भ्रमात ठेवले आणि सामन्याचा निकाल सांगितला नाही. त्यानंतर ती डोप चाचणीसाठी गेली तेव्हा तेव्हा ती मॅच हरल्याचे दिसून आले. यानंतर मेरी कोमने फसवणुकीचा आरोप देखील केला.

IPL

आयपीएल 2021 (IPL 2021) पहिल्यांदा भारतातच आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने कहर केला होता. देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत होते आणि लोक अस्वस्थ झाले होते. पण बीसीसीआयने या स्पर्धेचे आयोजन अत्यंत कडक बायो- बबलमध्ये केले होते. अर्धी स्पर्धा सुरळीत पार पडली पण नंतर कोरोनाची प्रकरणे समोर आली. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली. सुरुवातीला बीसीसीआयने हे प्रकरण दडपावे असे वाटत होते पण हे प्रकरण समोर आले. त्यानंतर लगेचच ही स्पर्धा थांबवण्यात आली. पुढे जाऊन आयपीएलचे सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.

Manika Batra

भारतीय क्रीडा क्षेत्रातील समस्या ही आहे की व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यात सतत संघर्ष होत असतो. 2021 मध्येही ती तशीच राहिली. टेबल टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया आणि उदयोन्मुख खेळाडू मनिका बत्रा यांच्यातील वाद यावर्षी चर्चेत होता. टोकियो ऑलिम्पिकदरम्यान मनिका बत्रावर वैयक्तिक प्रशिक्षक घेण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही मागणी मान्य न झाल्याने राष्ट्रीय प्रशिक्षकाने सौम्यदीप रॉय यांची मदत घेण्यास नकार दिला. ऑलिम्पिकनंतर या प्रकरणी मनिकाकडून उत्तर मागवण्यात आले होते. त्यानंतर मनिका म्हणाली की, राष्ट्रीय प्रशिक्षकाने तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान मुद्दाम सामना गमावण्यास सांगितले. त्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर राष्ट्रीय शिबिरात सहभागी न झाल्यामुळे मनिका बत्राची आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली नाही. मनिका कोर्टात गेली. तिथे टेबल टेनिस फेडरेशनला कोर्टातून फटकारले.

Quinton De Kock

ब्लॅक लाइव्ह्स मॅटरच्या समर्थनार्थ एका गुडघ्यावर बसावे लागते. खेळांमध्ये, खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी हे करतात. क्रिकेटच्या मैदानातही खेळाडूंनी हे केले. 2021 मध्ये T20 विश्वचषक UAE मध्ये झाला तेव्हा सर्व सामन्यांपुढे गुडघे टेकण्याचा अलिखित नियम होता. पण यावरूनही वाद निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्पर्धेदरम्यान सर्व सामन्यांपूर्वी गुडघे टेकणे अनिवार्य केले होते. याच्या निषेधार्थ क्विंटन डी कॉकने सामन्यातून माघार घेतली. गुडघे टेकणे अनिवार्य करण्यास त्याचा विरोध होता. मात्र, नंतर त्याला ही बाब समजल्याने त्यानेही गुडघे टेकण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिका हा अनेक काळापासून वर्णभेदाने ग्रासलेला देश आहे. अशा स्थितीत डिकॉकच्या घटनेने या देशातील वर्णद्वेषाची समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT