आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात यशस्वी जयस्वालचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे गरज असल्यास त्याला दुबईला जावं लागेल.
दरम्यान संघाबाहेर असलेल्या जयस्वालने आता रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात जयस्वालही खेळताना दिसून येणार आहे.
रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलच्या सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ गेल्या हंगामात फायनल खेळताना दिसून आले होते. या सामन्यात मुंबईने बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.
नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेसाठी जयस्वालला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. त्याला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी दिली गेली. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसून राहावं लागलं. जयस्वालला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती. मात्र त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला. राखीव खेळाडू असूनही तो दुबईला जाऊ शकणार नाहीये.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना मुंबई आणि हरियाणा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र फलंदाजीत अजिंक्य रहाणे आणि गोलंदाजीत शार्दुल ठाकूर चमकला. भारतीय संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकून उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. आता विदर्भाला हरवून मुंबईचा संघ फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.