yashasvi jaiswal saam tv
Sports

Team India Squad: जयस्वालची एन्ट्री होणार, पण विराटच्या खास भिडूला बसावं लागेल

Team india squad For Champions Trophy, Yashasvi Jaiswal: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान या संदुत यशस्वी जयस्वालला संधी दिली जाऊ शकते.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार , चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी एकाच दिवशी संघाची घोषणा होऊ शकते. दरम्यान कोणाला संधी मिळणार ? जाणून घ्या.

रोहित आणि विराटला संधी मिळणार का?

रोहित शर्मा आणि विराट कोहली, दोघांनीही टी -२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दोघांनाही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

त्यामुळे आता दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना दोघांना वनडे संघात स्थान मिळणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. जर संधी मिळाली तर दोघांसाठीही ही स्पर्धा अतिशय महत्वाची ठरेल. कारण या स्पर्धेत जर भारताने विजय मिळवला, तर दोघेही निवृत्ती घेऊ शकतात. मात्र जर पराभव झाला तर, निवडकर्ते निर्णय घेऊ शकतात.

यशस्वी जयस्वालला संधी मिळणार?

यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेट गाजवलं आहे. गेल्या १ वर्षात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचा फॉर्म पाहता, अस म्हटलं जातं आहे की इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी यशस्वी जयस्वालला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे शुभमन गिलला बसावं लागेल.

जयस्वालला जर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान द्यायचं असेल तर, त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी द्यावी लागेल. जर जयस्वालला संघात संधी मिळाली, तर शुभमन गिलला बाहेर बसावं लागेल. बॉर्डर - गावसकर ट्रॉफीतील १० डावात फलंदाजी करताना त्याने ५३.४१ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT