yashasvi jaiswal twitter
क्रीडा

Yashasvi Jaiswal: यशस्वीने कुटुंबाला दिलं मोठ गिफ्ट; मुंबईत आई-वडिलांसोबत 5 BHK घरात झाला शिफ्ट

Vishal Gangurde

Yashasvi Jaiswal News: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या डेब्यू मॅचमध्ये शतक ठोकण्याचं अनेक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र, शतक ठोकण्याचा इतिहास फार कमी खेळाडूंनी केला आहे. या यादीत भारताच्या २१ वर्षीय यशस्वी जयस्वालने स्थान मिळवलं आहे. यशस्वीने वेस्टइंडिज विरुद्ध १७१ धावांची यशस्वी खेळी केली. या मोठ्या खेळीसोबत यशस्वीने मुंबईत नव प्रशस्त घर घेत आई-वडिलांना मोठं गिफ्ट घेतलं आहे. (Latest Marathi News)

यशस्वी जयस्वाल हा भारताच्या डेब्यू सामन्यात शतकी खेळी करणारा १७ वा खेळाडू ठरला आहे. जयस्वालचं कुटुंब मुंबईत भाडेतत्वावर २ बीएचके घरात गेल्या दोन वर्षांपासून राहत होतं. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, यशस्वी कुटुंब आता मुंबईत ५ बीएचके घरात राहायला गेलं आहे.

यशस्वीचा भाऊ तेजस्वीने सांगितले की, यशस्वी वेस्टइंडिजमध्ये असतानाही नव्या घरात शिफ्टिंगविषयी माहिती घेत होता. त्याचं स्वप्न होतं की, त्याच्या कुटुंबाजवळ एक स्वत:चं घर असावं. यशस्वी जुन्या घरात राहू इच्छित नव्हता'.

दरम्यान, यशस्वीने वेस्टइंडिजच्या विरोधात पहिल्या सामन्यात १७१ धावांची मोठी खेळी खेळली. यशस्वीने १७१ धावांची खेळी करत अनेक नवे विक्रम नावावर केले आहेत. यशस्वी हा डेब्यू टेस्टमध्ये १५० हून अधिक धावा करणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. पहिल्या डेब्यू सामन्यात सर्वाधिक धावा शिखर धवनने केल्या आहेत. तर दुसरा क्रमांकावर रोहित शर्मा आहे.

इतिहास रचण्याची संधी हुकली..

यशस्वी जयस्वालने या खेळीदरम्यान अनेक विक्रम नावावर केले . भारताबाहेर कसोटीत पदार्पण करताना सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. यशस्वीने गांगुलीचा रेकॉर्डही मोडून काढला आहे.

सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर १३३ धावांची खेळी केली होती. त्याच्याकडे आणखी एक मोठा विक्रम रचण्याची संधी होती. मात्र, यशस्वी केवळ १७१ धावा करू शकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT