yashasvi jaiswal create history in t20i india vs nepal asian games 2023  Saam TV
Sports

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वीची धुव्वाधार फलंदाजी; नेपाळची धुलाई करत ठोकलं वादळी शतक

Yashasvi Jaiswal: आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध खेळताना यशस्वीने वादळी शतक झळकावलं आहे.

Satish Daud

Yashasvi Jaiswal Asian Games 2023

भारतीय संघाचा युवा सलामीवर फलंदाज यशस्वी जायस्वालने मोठा भीमपराक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध खेळताना यशस्वीने वादळी शतक झळकावलं आहे. एशियन गेममध्ये भारताकडून शतक झळकवणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Latest Marathi News)

त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सलामीला आलेल्या यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला वादळी सुरुवात केली. पण दोघांनी मिळून नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 103 धावांच्या शतकी भागीदारीनंतर भारताला पहिला धक्का बसला.

त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी हराकिरी करत एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. दोघेही झटपट माघारी परतले. एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसरीकडे यशस्वी जायस्वालचे आपल्या फलंदाजीचा तडाखा कायम ठेवला.

यशस्वीने 48 चेंडूत 101 धावा कुटल्या. यामध्ये 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. शतकानंतर यशस्वी माघारी परतला. शेवटच्या क्षणी रिंकू-दुबेच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT