yashasvi jaiswal celebration  twitter/BCCI
Sports

Yashasvi Jaiswal Celebration: षटकार खेचत जयस्वालचं शतक पूर्ण! जगावेगळ्या सेलिब्रेशनचा Video व्हायरल

Yashasvi Jaiswal Celebration After Century: शतक झळकावल्यानंतर त्याने हटके सेलिब्रेशने केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal Celebration:

वनडे,टी-२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे.

या संधीचा पुरेपुर फायदा घेत त्याने पहिल्या सामन्यात ८० धावांची तर दुसऱ्या सामन्यात झुंजार शतकी खेळी केली आहे. दरम्याने हे शतक झळकावल्यानंतर त्याने हटके सेलिब्रेशने केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि पाहुण्या इंग्लंडला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानावर आली होती. (Yashasvi Jaiswal Celebration Video)

दोघांनी चांगली सुरुवात केली. मात्र रोहित शर्मा अवघ्या १४ धावांवर माघारी परतला. एकिकडून फलंदाज येत होते आणि जात होते. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती.

शतक झळकावल्यानंतर हटके सेलिब्रेशन..

यशस्वी जयस्वाल ज्यावेळी शतकी झळकावण्याच्या जवळ पोहोचला त्यावेळी त्याने एकेरी-दुहेरी धावा न काढता चौकार आणि षटकार मारायला सुरुवात केली. त्याने ९४ धावांवर फलंदाजी करत असताना स्टेप आऊट होऊन मिड ऑनच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला.

दरम्यान शतक झळकावल्यानंतर त्याने हेल्मेट आणि बॅट खाली ठेवत दोन्ही हात वर करत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या या हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Cricket news in marathi)

या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदाराबादच्या मैदानावर पार पडला होता. या कसोटीतही यशस्वी जयस्वालकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली होती. त्याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकलं होतं. या सामन्यात त्याला ८० धावांवर बाद होऊन माघारी परतावं लागलं होतं. तर या सामन्यात त्याने १५१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक साजरं केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

SCROLL FOR NEXT