Travis Head 1st centurion in WTC Saam TV
Sports

Travis Head 1st centurion in WTC : IPLमध्ये कुणीही भाव नाही दिला; त्याच हेडने WTCच्या फायनलमध्ये टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली

IND vs AUS: पहिल्या दिवशी हेडने शतक ठोकलं तर स्टिव्ह स्मिथ शतकाच्या जवळ पोहोचला आहे.

साम टिव्ही ब्युरो

WTC Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावे राहिला. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावत 327 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या ट्रेविस हेडने तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. पहिल्या दिवशी हेडने शतक ठोकलं तर स्टिव्ह स्मिथ शतकाच्या जवळ पोहोचला आहे.

WTCमध्य पहिलं शतक

हेडने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिलं शतक ठोकण्याचा मान पटकावला आहे. टीम इंडियाची सामन्यात सुरुवात चांगली झाली, पण दिवसअखेर संघ बॅकफूटवर आला. (Latest sports updates)

आयपीएलमध्ये अनसोल्ड

आयपीएलच्या 16व्या सीजनसाठी झालेल्या मिनी लिलावात ट्रॅव्हिस हेडला कोणीही विकत घेतले नव्हते. त्यामुळे तो अलसोल्ड राहिला. आयपीएलमध्ये आतापर्यंत 10 सामने खेळणाऱ्या हेडने एका अर्धशतकासह एकूण 205 धावा केल्या आहेत.

मात्र आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या हेडने टीम इंडियाच्या गोलंदाजांची दमछाक उडवली. त्यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी विविध फ्रँचायझी हेडला आपल्या संघात घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.

'टीम इंडियाची दमदार सुरुवात

पहिलं सेशन टीम इंडियाच्या नावे राहिलं. चौथ्या ओव्हरमध्येच मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला शार्दुल ठाकूरने 43 धावांवर बादल केलं. तर दुसऱ्या सेशनमध्ये 25व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनया बाद केले. अशारितीने 76 धावांवार ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावल्या होत्या. (Ind vs Aus)

मात्र त्यानंतर आलेल्या ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांची दमछाक केली. दिवस अखेरपर्यंत हेडने 156 चेंडूत 146 धावा केल्या. तर स्मिथने 227 चेंडूत 95 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार, हत्या करून मृतदेह शेतात पुरला

Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

Akshay Kelkar : तारीख ठरली! अक्षय केळकरची हॉरर मालिका 'या' दिवशी होणार सुरू, वेळ आताच नोट करा

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! आता स्क्रिन शेअर करता येणार; कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT