Virat Kohli WTC Record saam tv
क्रीडा

WTC Final 2023: विराट कोहली क्रिकेट विश्वात रचणार इतिहास! फायनलमध्ये 'महाविक्रमा'ला घालणार गवसणी

Virat Kohli World Record: WTC Final मध्ये भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली क्रिकेट विश्वात ऐतिहासिक विक्रम रचण्याच्या तयारीत आहे.

Chandrakant Jagtap

Virat Kohli WTC Record: उद्यापासून म्हणजेच 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन संघात जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी अंतिम सामना खेळला जाणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना (WTC Final 2023) खेळवला जाईल. या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेट विश्वात ऐतिहासिक विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. हा महान विक्रम सध्या खेळत असलेल्या जगातील कोणताही फलंदाजाला आपल्या नावावर करण्यात अद्याप यश आलेले नाही. त्या विक्रमाला विराट गवसणी घालण्याची शक्यता आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 जून ते 11 जून दरम्यान होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराटने 112 धावा केल्या, तर तो आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनणार आहे. सध्या खेळत असलेला कोणताही फलंदाज हा महान विक्रम आपल्या नावावर करू शकलेला नाही. विराट कोहलीने हा महान विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे.

सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडणार?

विराट कोहलीने अंतिम सामन्यातील दोन्ही डावात मिळून 112 धावा केल्या तर तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडेल. सध्या आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या बाद फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर आहे.

रिकी पाँटिंगने आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यांतील 18 डावात 731 धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने आयसीसीच्या बाद फेरीतील 14 डावात 658 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने आसीसीच्या नॉकआऊट सामन्यांच्या 15 डावात 620 धावा केल्या आहेत. (Latest Sports News)

विराट कोहली सध्याच्या क्रिकेटचा 'किंग'

विराट कोहलीने अंतिम सामन्यात 112 धावा केल्या तर तो सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये हा विक्रम करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,322 धावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत. (Latest WTC Final Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT