IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून तयारी केली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, ' सर्वप्रथम तो संघात असणं ही संघासाठी आनंदाची बातमी आहे. संघात काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले, त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यासारखा गुणवान खेळाडू संघात असणं ही आमच्यासाठी समाधानकारक बाब आहे. तो आपल्या अनुभवाचा चांगला वापर करतो. परदेशात त्याने चांगली कामगिरी केली आहे. ज्यात इंग्लंडचा देखील समावेश आहे. त्याने संघासाठी अनेकदा चांगली खेळी केली आहे. यासह स्लीपमध्ये तो उत्तम क्षेत्ररक्षण करतो. त्याने संघाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे.'
तसेच राहुल द्रविड पुढे म्हणाले की, ' तो एक सामन्यासाठी असलेला खेळाडू नाही. कधी कधी एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर केलं जातं. हे दगडावर नाही लिहिलं की, तुम्हाला एकच सामना खेळण्याची संधी मिळेल. जर तो चांगली कामगिरी करत राहिला तर कोणास ठाऊक कधीपर्यंत संघात कायम राहील.' (Latest sports updates)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.