Rohit sharma  twitter
क्रीडा

WTC Points Table: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं? दक्षिण आफ्रिका- वेस्टइंडीज सामना ड्रॉ; गुणतालिकेत कितव्या स्थानी?

Ankush Dhavre

Latest WTC Points Table Update: वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. क्वीन्स पार्क स्टेडियममध्ये झालेला हा सामना ड्रॉ झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुण तालिकेत काय फरक पडला? जाणून घ्या.

हा सामना ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ४-४ गुणांची विभागणी करण्यात आली आहे. वेस्टइंडीजचा संघ २० गुणांसह सर्वात शेवटी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १६ गुणांसह ७ व्या स्थानी पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ कितव्या स्थानी?

दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला तेवळ १ सामना जिंकता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि १ सामना ड्रॉ राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेची विजायाची सरासरी ही २५ टक्के इतकी आहे.

तर वेस्टइंडीज संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर , या संघाने ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ५ सामने गमावले असून २ सामने ड्रॉ राहिले आहेत. वेस्टइंडीजची विजयाची सरासरी ही १९.०४ इतकी आहे.

भारतीय संघ कितव्या स्थानी?

भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ही ६८.५२ इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६२.५० इतकी आहे. भारतीय संघाला इथून पुढे बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणार.

दक्षिण आफ्रिका- वेस्टइंडीज कसोटी सामना ड्रॉ

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ३५७ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार टेम्बा बावुमाने ८६ धावांची खेळी केली. तर टोनी डी जोरजीने ७८ धावांची शानदार खेळी केली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या वेस्टइंडीजला २३३ धावा करता आल्या. या संघातील कुठल्याच फलंदाजाला ५० धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. या डावात शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १२४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ताबडतोड १७३ धावा केल्या.

वेस्टइंडीजला हा सामना जिंकण्यासाठी २९८ धावांचं आव्हान मिळालं होतं. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. मात्र एलिक अथानाजेने ९२ धावांची शानदार खेळी केली आणि २०१ संघाची धावसंख्या २०१ धावांपर्यंत पोहोचवली. यासह हा सामना बरोबरीत समाप्त झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT