indian cricket team twitter
Sports

WTC Points Table: WTC च्या गुणतालिकेत मोठा फेरबदल! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, तर टीम इंडियाची चांदी

World Test Cricket Points Table Update: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Latest Cricket Updates in Marathi: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयानंतर अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ आणखी मजबूत स्थितीत पोहोचला आहे. तर बांगलादेशला मोठा धक्का बसला. दुसरीकडे न्यूझीलंडला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे .

न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला धूळ चारली आहे. या पराभवानंतर न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. तर श्रीलंकेचा मोठा फायदा झाला आहे.

न्यूझीलंडला पराभूत करताच श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाची विजयाची सरासरी ५० इतकी झाली आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेची विजयाची सरासरी ४२.८६ इतकी होती. तर पराभूत झालेला न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानी सरकला आहे.

कोणता संघ कितव्या स्थानी?

या यादीत भारतीय संघ ७१.६७ विजयाच्या सरासरीसह अव्वल स्थानी आहे. तर ६२.५० विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. ५० टक्के विजयाच्या सरासरीसह श्रीलंकेचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर ४२.८६ टक्के विजयाच्या सरासरीसह न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचा संघ ४२.१९ टक्के विजयाच्या सरासरीसह पाचव्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ ३९.२९ टक्के विजयाच्या सरासरीसह सहाव्या, दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८.८९ टक्के विजयाच्या सरासरीसह सातव्या,पाकिस्तानचा संघ १९.०५ टक्के विजयाच्या सरासरीसह आठव्या आणि वेस्टइंडीजचा संघ १८.५२ टक्के विजयाच्या सरासरीसह सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT