Wriddhiman Saha saam tv
Sports

Wriddhiman Saha: टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी वृद्धिमान साहाने स्वतःहून नाकारली! कारण काय? जाणून घ्या

Duleep Trophy: एमएस धोनीनंतर भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वृद्धिमान साहाकडे पाहिलं जात होतं.

Ankush Dhavre

Wriddhiman Saha Refused To Play: गुजरात टायटन्सच्या वृद्धीमान साहाची तुफान फटकेबाजी तुम्ही आयपीएलमध्ये पाहिलीच असेल. पण एवढा चांगला यष्टीरक्षक फलंदाज असूनही तो भारतीय संघात का नाही असा सवाल अनेकांना पडतो.

मात्र धोनीमुळे वृद्धीमान साहाचं टॅलेंट झाकलं गेलं, असं बोललं तर वावगं ठरणार नाही. गेल्या वर्षी त्याला संघाबाहेर केलं गेलं होतं. एमएस धोनीनंतर भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वृद्धिमान साहाकडे पाहिलं जात होतं.

मात्र रिषभ पंतची एंट्री झाली आणि पुन्हा एकदा वृद्धिमान साहा पर्यायी यष्टीरक्षक बनला. आता वृद्धीमान साहाने असं काहीतरी केलं आहे,ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने दिलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. ईशान किशन बाहेर पडताच, निवडकर्त्यांनी दुसरा पर्याय म्हणून वृद्धिमान साहासोबत संपर्क साधला.

वृद्धिमान साहा हा त्रिपुरा संघाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र वृद्धीमान ही ऑफर नाकारली आहे. त्याने स्पष्ट म्हटले आहे की, भारतीय संघात कमबॅक होणं कठीण आहे. त्यामुळे कुठल्यातरी युवा खेळाडूला संधी मिळायला हवी.

आयपीएल २०२३ स्पर्धेत वृद्धिमान साहाने गुजरात टायटन्स संघासाठी दमदार कामगिरी केली होती. गुजरातला अंतिम फेरीत पोहचवण्यात साहाने देखील मोलाचे योगदान दिले होते. तसेच भारतीय संघासाठी खेळताना त्याने ४० कसोटी सामने खेळले आहेत.

यादरम्यान त्याने १३५३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे ३ शतके झळकावण्याची नोंद आहे. ११७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. (Latest sports updates)

वृद्धिमान साहा बाहेर होताच या खेळाडूंना मिळाली संधी..

त्रिपुरा संघाचे निवडकर्ते जयंत डे यांनी वृद्धिमान साहासोबत चर्चा केली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'रिद्धिमान साहाने म्हटले की, दिलीप ट्रॉफी स्पर्धेतून भारतीय संघात जाण्याचा मार्ग मिळतो. मी जर आता भारतीय संघासाठी खेळू शकणार नाही. तर युवा खेळाडूच्या मार्गात अडथळा बनण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही अभिषेक पोरेलची निवड केली आहे. जो या यादीत तिसऱ्या स्थानी होता.'

अभिषेक पोरेलने आयपीएल २०२३ स्पर्धेतून पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याला फलंदाजी करताना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र यष्टिच्या मागे त्याने दमदार कामगिरी केली होती.

दिलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी असा आहे ईस्ट झोनचा संघ:

अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), शंतनू मिश्रा, सुदीप घरामी, रियान पराग, ए मजूमदार, बिपिन सौरभ, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), के कुशाग्र (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम (उपकर्णधार), शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाश दीप, अनुकुल रॉय, एम मुरा सिंग, इशान पोरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं, साध्वी ममतासाठी दाऊदही साधू

आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला, कडूंचा फॉर्म्युला सरकार मान्य करणार?

SCROLL FOR NEXT