Maharashtra Kesari, murlidhar mohol, Balasaheb Landge saam tv
Sports

Maharashtra Kesari : आयाेजनाच्या वादामुळे आखाड्या बाहेर रंगलीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

गतवेळची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साता-यात झाली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

Maharashtra Kesari : भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. त्यामुळे या कुस्तीगीर परिषदेच्या माजी पदाधिका-यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयाेजित करता येणार नाही असे पत्र महासंघाने काढले आहे. दुसरीकडे यंदा देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावर ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळासाहेब लांडगे हे ठाम राहिले आहेत. क्रीडा क्षेत्रात मानाची समजल्या जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयाेजन वादाच्या भाेव-यात आले आहे. (Maharashtra Kesari Latest Marathi News)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून नवीन वाद उभा राहिला आहे. कुस्तीशी निगडित राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्यातील संघटना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे माजी पदाधिकारी यांच्यामध्येच डावपेचांची लढत सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची कार्यकारिणी भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केली आहे. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून राज्यासाठी एका अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली.

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे (pune) राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबत निर्णय या समितीने घेतला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केलेल्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांनी केला आहे. स्पर्धेच्या आयोजना संदर्भात त्यांनी एक बैठक देखील बोलावली होती. (Maharashtra News)

बाळासाहेब लांडगे यांच्या भूमिकेवर भारतीय कुस्ती महासंघाने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब लांडगे हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव नाहीत. त्यांची कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं ते आयोजन करताहेत अशी माहिती मिळत आहे. त्यांनी भरवलेल्या स्पर्धेत कुस्तीपटुंनी सहभागी होऊ नये अशा आशयाचं पत्रक भारतीय कुस्ती महासंघानं काढलं आहे.

दरम्यान दुसरीकडे बाळासाहेब लांडगे हे मात्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेपुर्वी पदाधिका-यांचे डावपेच सुरु झाल्याचे पाहवयास मिळत आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT