wrestling competition held at danrubre village near maval. saam tv
क्रीडा

दुभती म्हैस, पाच बकरे जिंकण्यासाठी ५०० मल्ल आखाड्यात; नागेश राक्षेने मारली बाजी

मावळात पैलवान शेतकऱ्यांना मिळालेल्या या जनावरे रुपी बक्षिसांचा नक्कीच फायदा होणार त्यात काहीच शंका नाही.

दिलीप कांबळे

मावळ : दांरूब्रे (maval) गावातील काळभैरवनाथ आणि वाघजाई मातेच्या उत्सवानिमित्त कुस्तीचा आखाडा (wrestling competition) भरला होता. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास (wrestler) बक्षिस म्हणून चक्क म्हैस आणि बकरे देण्यात आले. पैश्यांऐवजी शेतकऱ्यांच्या (farmers) उपयोगी पडणारे प्राणी देण्याचा आयोजकांच्या या संकल्पनेचे अनेकांनी काैतुक केले. या स्पर्धेत म्हैस आणि पाच बकऱ्यांना जिंकण्यासाठी जवळपास पाचशे मल्ल आखाड्यात उतरले होते. (maval latest marathi news)

पुणे (pune) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल मावळात दाखल झाले होते. नागेश राक्षे आणि सुहास कदम या दोन मल्लांमध्ये अंतिम कुस्ती झाली. सुहासला चितपट करत नागेशने दुभती म्हैस पटकावली. तर राजवर्धन घारे, देवा निंबळे, विपुल आडकर, ओंकार दगडे आणि राजू गायकवाड यांना बक्षीसरूपात बकरे मिळाले.

nagesh rakshe won in wrestling competition

या आगळ्या-वेगळ्या बक्षिसांमुळं हा आखाडा मावळातील पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला. तरुण शेतकरी राजेश वाघोले यांच्या संकल्पनेतून बक्षिसे देण्यात आली. पैसे दिले तर ते खर्च होतात मात्र पैलवान शेतकऱ्यांना मिळालेल्या या जनावरे रुपी बक्षिसांचा नक्कीच फायदा होईल अशी भावना राजेश वाघोले यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT