r praggnanandhaa canva
क्रीडा

R Praggnanandhaa: आर प्रज्ञानंद चमकला! ५ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश

R Praggnanandhaa Enters In Semi Final: आर प्रज्ञानंदने क्वार्टर फायनलमध्ये झालेल्या सामन्यात विश्वनाथन आनंद यांना पराभूत केलंय.

Ankush Dhavre

भारताचा ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रज्ञानंदची शानदार कामगिरी सुरुच आहे. प्रज्ञानंदने डब्ल्यूआर चेस मास्टर २०२४ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना प्रज्ञानंद आणि वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यात पार पडला. या सामन्यात प्रज्ञानंद विश्वनाथन आनंद यांच्यावर भारी पडल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंद यांना पराभूत करत सेमीफायनमध्ये प्रवेश केला आहे.

असा राहिला या स्पर्धेतील प्रवास

काही दिवसांपूर्वी झालेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या प्रज्ञानंदने आपला शानदार खेळ या स्पर्धेतही सुरु ठेवला आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यापूर्वी झालेल्या सामन्यात त्याने मोलदोवाच्या विक्टर बोलोगनला पराभूत केलं होतं. राऊंड १ फेरीतील या सामन्यात प्रज्ञानंदने विक्टरला २-० ने पराभूत केलं होतं.

आता क्वार्टर फायनलमध्ये विश्वनाथन आनंद यांना पराभूत करत त्याने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलंय. त्यामुळे प्रज्ञानंद आता फायनल जिंकून इतिहास रचणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कशी झाली प्रज्ञानंदच्या कारकिर्दीची सुरुवात

प्रज्ञानंद हा भारताचा युवा बुद्धीबळपटू आहे. मात्र त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच थक्क केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना चेक मेट केलंय. आर प्रज्ञानंद आणि त्याची बहीण वैशाली हे दोघेही बुद्धीबळपटू आहेत. आर प्रज्ञानंदच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आर प्रज्ञानंद ३ वर्षांचा असतानाच बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली होती. दोघांनी टीव्ही कमी पाहावा म्हणून आम्ही त्यांना बुद्धीबळ खेळायला सांगितलं. त्यानंतर दोघांनाही ते आवडलं आणि दोघे शिकले. आमच्यासाठी ही आनंदाजी बाब आहे, दोघेही शिकताय आणि दोघे यशस्वी झाले आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT