Delhi Capitals beat Gujarat Giants by 10 wickets SAAM TV
Sports

WPL 2023: शेफाली वर्माचा झंझावात! 28 चेंडूत कुटल्या 76 धावा; Delhi Capitals ची Gujarat Giants वर 10 विकेटने मात

WPL 2023 9th Match Updates: दिल्लीचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. दिल्ली कॅपिटल्स आता 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Chandrakant Jagtap

Gujarat Giants vs Delhi Capitals : शेफाली वर्माच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगच्या नवव्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. दिल्लीचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे.

या सामन्यात गुजरातने दिलेल्या 106 धावांच्या माफल लक्षाचा पाठलाग करताना सलामीवीर शेफाली वर्माने झंझावाती खेळी करत 28 चेंडूत 76 धावां केल्या, तर कर्णधार मेग लेनिंगने 15 चेंडूत 21 धावांची खेळी करत गुजरातविरोधात मोठा विजय मिळवला.

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे दिल्ली कॅपिट्लस विरुद्ध गुजरात जायन्टस सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 20 षटकांत 9 बाद 105 धावांचे आव्हान ठेवले. (Latest Sports News)

गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. शेफाली वर्माने 28 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार ठोकत 76 धावा केल्या, तर कर्णधार मेग लॅनिंगने 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. या दोन्ही फलंदाजांनी मिळून अवघ्या एकही विकेट न गमावता 7.1 षटकांत लक्ष्य गाठले.

दिल्लीचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. दिल्ली कॅपिटल्स आता 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे गुजरातला चार सामन्यांत तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुजरात दोन गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT