Mumbai Indians  Saam TV
Sports

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, धडाकेबाज खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर मुंबई संघाची जबाबदारी असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

WPL 2023: वुमन्स प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सीजनची सुरुवात ४ मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या महिला संघानेही आपल्या संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर मुंबई संघाची जबाबदारी असणार आहे. लिलावादरम्यान मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हरमनप्रीत कौरला 1 कोटी 80 लाख रुपये खर्चून संघात समाविष्ट करुन घेतले आहे. (Latest sports updates)

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे. 13 फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हरमनप्रीत संघात समावेश केला. (Sports News)

हरमनप्रीत कौरने भारतासाठी आतापर्यंत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरने 3058 धावा केल्या आहेत. यात तिने T20 मध्ये एका शतकासह 10 अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. हरमनप्रीत कौरने महिला टी-20 चॅलेंजमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. या स्पर्धेतही तिने आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आहे.

WPL 2023 च्या मोसमातील मुंबई इंडियन्स महिला संघाबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर आणि यास्तिका भाटिया सारख्या महत्त्वाच्या भारतीय खेळाडू यात आहेत. याशिवाय या संघात नताली सिव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि अमेलिया केर या परदेशी खेळाडूंचा भरणा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; ३४८ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

SCROLL FOR NEXT