WPL 2023 Saamtv
क्रीडा

RCB-W vs GG-W: गुजरात जायंट्सच्या डंक्लेची तुफान खेळी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 202 धावांचं आव्हान

महिला प्रीमियर लीगमधील सहावा सामना आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यात सुरू आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

Gangappa Pujari

Royal Challengers Bangalore Women vs Gujarat Giants Women: महिला प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजराज जायंट्सशी होत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांसमोर अस्तित्वाचे आव्हान असताना गुजरातनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या महिला फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत 20 षटकात 7 गडी गमवून 201 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे. (Cricket Update)

या सामन्यात सोफिया डंक्लेने 65 तर हरलीन देओलने 67 धावा चोपल्या. फिया डंकले आणि हर्लीन देओलच्या आक्रमक खेळीपुढे बंगळुरुचे गोलंदाज फिके पडले. सोफिया डंकलेनं 28 चेंडूत 65 धावा, तर हर्लीन देओलनं 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली.दोन्ही संघानं साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी आतुर आहेत. सामन्यात हर्लीननं आपला आक्रमक अंदाज दाखवला. हर्लीनने 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 चेंडूत 67 धावा केल्या.

त्याआधी इंग्लंडच्या सोफी डंक्लेने पॉवर प्लेमध्येच तुफान फटकेबाजी करत 18 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तिने WPL 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मुंबई इंडियन्सच्या हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडला. हरमनप्रीत कौरने गुजरात जायंट्सविरूद्धच 22 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. डंक्लेने प्रीतीच्या एकाच षटकात 4, 6, 6,4, आणि 4 अशी सलग चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या षटकात डंक्लेने तब्बल 23 धावा चोपल्या.

दोन्ही संघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा....

या सामन्यात कोणता संघ विजयाचा प्रमुख दावेदार आहे याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. (Women Cricket)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT