Women's Premier League 2023, DC vs RCB Twitter
क्रीडा

WPL 2023: शफाली वर्मानं RCB ला धू धू धुतलं, 45 चेंडूत ठोकल्या 84 धावा; स्मृती मंधनाच्या संघासमोर विजयासाठी भलंमोठं लक्ष

Shafali Verma : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात शेफाली वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

Chandrakant Jagtap

Women's Premier League 2023, DC vs RCB : : महिला प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात शेफाली वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

शेफालीने अवघ्या 45 चेंडूत 84 धावांची खेळी केली, याशिवाय मेग लेनिंगनेही 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्लीने आरसीबीसमोर 224 धावांचं भलंमोठं लक्ष्य ठेवलं आहे. (Latest Cricket News)

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीसाठी कर्णधार मेग लेनिंग आणि स्फोटक फलंदाज शफाली वर्मा यांनी डावाला सुरुवात केली. दोघींनी मिळून सुरुवातीपासूनच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली.

पहिल्या 6 षटकात दोघांनी मिळून संघासाठी 57 धावा जोडल्या. यानंतरही दोघांची तुफानी खेळी सुरूच राहिली आणि 10व्या षटकातच संघाची धावसंख्या 100 च्या पुढे गेली. दरम्यान शेफाली वर्माने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. (Latest Sports News)

मेग लॅनिंगनेही दमदार फलंदाजी करत अकराव्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. दोघांची धडाकेबाज फलंदाजी सुरूच राहिली आणि 14 षटकांत संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 150 च्या पुढे गेली. लॅनिंग 43 चेंडूत 72 धावा करून बाद झाली.

यानंतर शेफाली वर्माही 45 चेंडूत 84 धावांची खेळी करून बाद झाली. या खेळीत तिने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. यानंतर मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही जबरदस्त फलंदाजी करत संघाची धावसंख्या 220 च्या पुढे नेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT