WPL Match GG vs UPW:  Saamtv
क्रीडा

WPL 2023: हरलीन देओलची दमदार खेळी; गुजरात जायंट्सकडून यूपी वॉरियर्सला १७० धावांचे टार्गेट

GG vs UPW: स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (GG vs UPW) या संघामध्ये होत आहे.

Gangappa Pujari

WPL 2023 UP Warriorz vs Gujarat Giants: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (GG vs UPW) या संघामध्ये होत आहे. संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. त्यानुसार या संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६९ धावा केल्या. त्याचबरोबर यूपी वॉरियर्स संघासमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. (Latest Marathi News Update)

या दोन्ही संघामधील डॉ.डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळला जात आहे. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात जायंट्ससाठी सबभीनेनी मेघना आणि सोफिया डंकले या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांचे योगदान दिले. ज्यानंतर सोफिया डंकले ११ चेंडूत १३ धावा काढून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बोल्ड केले. त्यानंतर सबभीनेनी मेघना २४ (१५), सुष्मा वर्मा ९(१३), अॅनाबेल सदरलँड ८(१०) आणि ऍशलेघ गार्डनर २५(१९) धावांचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात जायंट्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ३२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर हेमलता आणि स्नेह राणाने अनुक्रमे नाबाद २१ आणि ९ धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला ६ बाद १६९ धावा करता आल्या.

तत्पुर्वी आजच्या दिवसातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आधी स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवत तब्बल 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या.

त्यानंतर 120 चेंडूत 224 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबी संघाला हे मोठं लक्ष्य पार करता आलं नाही. कोणतीच खेळाडू अर्धशतकही झळकावू शकली नाही. ज्यामुळे संपूर्ण संघ 163 धावाच 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात करु शकला आणि सामना 60 धावांनी दिल्लीने जिंकला.  (Womens Cricket)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT