Mitchell Marsh ESPN
क्रीडा

World Cup 2023: मिचेल मार्शने २६ चेंडूत चोपल्या १२२ धावा; पुण्यात क्रिकेटच्या विक्रमांचा पाऊस

Bharat Jadhav

World Cup Australia Vs Bangladesh :

पुण्याच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशच्या क्रिकेट संघात आज झालेल्या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचे ३०७ धावांचे आव्हान २ फलंदाजांच्या मोबदल्यात ४४.४ षटकातच पार केलं. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्शने नाबाद राहत १३२ चेंडूत १७७ धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मार्शने खेळीत १७ चौकार आणि ९ षटकार मारत अवघ्या २६ चेंडूत १२२ धावा केल्या. मिचेल मार्शाने चेस करताना नाबाद १७७ धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडली. (Latest News)

वर्ल्डकपच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार

बांगलादेशविरूद्ध वनडेमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंची सर्वात मोठी भागीदारी

  • २०१९ नॉटिंगहम, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर - १९२ धावा

  • २०२३ पुणे, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ - नाबाद १७५ धावा

  • २०११ मिरपूर, रिकी पाँटिंग आणि शेन वॉट्सन - १७० धावा

वर्ल्डकपच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा बांगलादेशचे गोलंदाज

  • २००७ - पोर्ट ऑफ स्पेन, श्रीलंकेविरूद्ध अब्दुर रझाकने ८६ धावा दिल्या.

  • २०२३ - पुणे, ऑस्ट्रेलियाविरूद्ध नसुम अहमदने ८५ धावा दिल्या.

  • २०१९ - नॉटिंगहम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रुबेल हुसैनने ८३ धावा दिल्या.

  • २०१५ - मेलबर्न, श्रीलंकेविरूद्ध तस्कीन अहमदने ८२ धावा दिल्या.

बांगलादेशविरूद्ध वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

  • २०२३ वर्ल्डकप - मिचेल मार्शने पुण्यात नाबाद १७७ धावा केल्या.

  • २०११ वर्ल्डकप - वरेंद्र सेहवागने मिरपूरमध्ये १७५ धावांची खेळी केली.

  • २०२३ वर्ल्डकप - क्विंटन डिकॉकने वानखेडेवर १७४ धावा केल्या.

  • 2019 वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरने नॉटिंगहममध्ये 166 धावांची खेळी केली.

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

  • २०२३ वर्ल्डकप - ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तानविरूद्ध नाबाद २०१ धावा.

  • २०१५ वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरची अफगाणिस्तानविरूद्ध १७८ धावांची खेळी.

  • २०२३ वर्ल्डकप - मिचेल मार्शची बांगलादेशविरूद्ध नाबाद १७७ धावांची खेळी.

  • २०१९ वर्ल्डकप - डेव्हिड वॉर्नरची बांगलादेशविरूद्ध १६६ धावांची खेळी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT