टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचं काही दिवसांपूर्वी निष्पन्न झालं होतं. मात्र शुभमन गिल लवकरच बरा होईल आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितसोबत फलंदाजीला उतरले, असा अंदाज होता. (World Cup 2023)
मात्र शुभमन गिलची तब्येत बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तरी शुभमन खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गिलच्या प्लेटलेट्समध्ये अचानक घट झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीवर आणखी परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest sports updates)
विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात तो खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धही खेळणार नाही. मात्र आता रुग्णालयात दाखल झाल्यामुळे गिल १४ ऑक्टोबरच्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचीही शक्यता कमी आहे.
शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यानंतर त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक क्रिकेट फॅन आता प्रार्थना करत आहे की शुभमन लवकर बरा होईल आणि रोहितसोबत मैदानात उतरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.