Mohammad Rizwan Saam Tv
क्रीडा

Mohammad Rizwan : मॅचविनिंग शतक झळकावूनही पाकिस्तानचा रिझवान होतोय ट्रोल, 'ते' ट्विट आलं अंगाशी

Bharat Jadhav

Mohammad Rizwan On Gaza Strip:

एकदिवशीय वर्ल्डकप २०२३चा महासंग्राम चालू आहे, त्याच दरम्यान इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध पेटलंय. दरम्यान मंगळवारी वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना झाला. या सामना श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये झाला होता. सामना पाकिस्तानने ६ विकेट राखत जिंकला असून या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीकनं शानदार शतक केलं. त्याच्या फलंदाजीचं क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकही केलं. परंतु सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे तो सध्या ट्रोल होतोय. (Latest News)

सामना जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना रिझवानने सोशल मीडियावर पोस्ट करताना गाझाची आठवण करत इस्राइल आणि हमासच्या युद्धाला थेट क्रिकेटच्या मैदानात आणलं. रिझवानने आपलं शतक गाझाच्या नागरिकांना समर्पित केलं. रिझवानने एक्स (आधीच्या ट्विटरवर) वर पोस्ट करताना म्हटलं की, हे शतक गाझातील माझे भाऊ आणि बहिणींसाठी आहे. या विजयासाठी माझं योगदान कामी आलं, मी खूश आहे. याचे संपूर्ण क्रेडिट संघाला आणि विशेष करून अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला जातं.

दरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केलाय. या युद्धात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये एकदिवशीय वर्ल्डकपमध्ये महेंद्र सिंग धोनीने भारतीय लष्कराला पाठिंबा दिला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धोनीने लष्कराचे चिन्हं असलेले ग्लब्स हातात घातले होते. धोनीने यष्टीरक्षण करताना जे ग्लब्ज घातले होते त्यावर भारतीय लष्कराचे बलिदान बॅच लावलेला होता. तेव्हा आयसीसीने कारवाई केली होती आणि ते लोगो हटवण्यास सांगितलं होतं. आता चाहत्यांनी रिझवानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान राजकीय विधान किंवा कोणते कृत्य करणं मान्य नसतं. आयसीसीच्या मते, क्रिकेट खेळाडूंनी राजकीय संकेतापासून दूर राहिले पाहिजे. जर अशा काही कृत्य केल्याचं निदर्शनात आले तर कारवाई केली जाते. धोनीसह २०१९ वर्ल्डकपमध्ये असेच झाले होते. यासह इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर मोईन अलीसोबतही असेच झाले होते. २०१४मध्ये भारताविरुद्धाच्या कसोटी सामन्यात मोईनने सेव गाझा (गाझाला वाचवा ) आणि फ्री पॅलेस्टाईन लिहिलेले रिस्टबॅण्ड परिधान केले होते. तेव्हा आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली होती. पुन्हा असे कृत्य करू नये अशी समज मोईनला आयसीसीसने दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT