World cup 2023 new zealand playing 11 for england vs new zealand match playing 11 prediction world cup news in marathi saam tv news
Sports

ENG vs NZ, Playing XI: गतविजेत्या इंग्लंडला आव्हान देण्यासाठी अशी असेल NZ ची प्लेइंग ११; संघात धाकड फलंदाज करतोय कमबॅक

England vs New Zealand, Playing 11: पाहा इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कशी असेल न्यूझीलंड संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

ODI World Cup 2023, England vs New Zealand, Playing 11

क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंडचा संघ आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने सामने येणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

या पराभवाचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानावर उतरणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल न्यूझीलंडe संघांची प्लेइंग ११ जाणून घ्या.

इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या या सामन्यात रचिन रविंद्र डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याने ९७ धावांची खेळी केली होती.त्याला साथ देण्यासाठी डेवोन कॉनव्हे सलामीला येऊ शकतो.

सराव सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, केन विलियमसन या पहिल्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.मात्र दोन्ही सराव सामन्यांमध्ये तो फलंदाजी करताना दिसून आला आहे. हे पाहता तो इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळू शकते संधी..

मध्यक्रमात डॅरील मिशेल चौथ्या क्रमांकावर तर टॉम लेथम पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. तर सहाव्या क्रमांकावर चॅपमन फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी ईश सोढी आणि मिचेल सँटनरला संधी दिली जाऊ शकते. या दोन्ही गोलंदाजांना साथ देण्यासाठी रचिन रविंद्र देखील गोलंदाजी करताना दिसून येईल. तर ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्यूसन या वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

इंग्लंडला आव्हान देण्यासाठी अशी असू शकते न्यूझीलंडची प्लेइंग ११:

रचिन रविंद्र, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लाथम (विकेटकीपर), मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्यूसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT