world cup 2023 india vs New Zealand semi final match updates Mumbai Police receive threat email  Saam TV
Sports

IND vs NZ Match: भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताची धमकी; वानखेडे मैदानाबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली

IND vs NZ Match: भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपात घडवू अशी धमकी अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना ई-मेल वरून दिली आहे.

Satish Daud

India vs New Zealand Semi Final Match Updates

भारत-न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यात घातपात घडवून आणू, अशी धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने ट्वीटरवरून पोलिसांना टँग करत ही धमकी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली असून वानखेडे मैदानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वचषक 2023 स्पर्धेत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ Semi Final Match) आमने-सामने येणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार असून सामन्यासाठी मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.

हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे. अशातच भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपात घडवून आणू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत, एका फोटोत गन, हॅड ग्रेनेड आणि काडतुस असलेले चित्र पोस्ट केले

त्याचबरोबर भारत न्यूझीलंड सामन्यादरम्यान 'आग लगा देंगे' अशा आशयाचे चित्र पोस्ट केले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून वानखेडे मैदानाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. पोलीस बंदोबस्तात ७ पोलीस उपायुक्त, २०० अधिकारी तसेच ७०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगला मनाई

एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी केली वाहनतळांची (पार्किंगची) व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपासूनच मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बॅंक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आधेपार्ह्य वस्तू तंबाखूजन्य पदार्थ न बाळगण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT