विश्वचषकात आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचे गोलंदाज सज्ज आहे. मात्र, या सामन्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहमद सिराजला मोठा धक्का बसला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने एकदिवसीय गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत मोहमद सिराजची घसरण झाली आहे. सिराजने काही दिवसांपूर्वीच आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं.
मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सिराजला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. केशव महाराजचं एकूण रेटिंग ७२६ इतकं आहे. तर सिराजचं रेटिंग ७२३ इतकं आहे.
दोघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास केशव महाराजने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरसारी २४.७१ इतकी असून इकनॉमी केवळ ४.३७ इतकी आहे. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये केशव महाराज तिसऱ्या स्थानी आहे.
दुसरीकडे मोहम्मद सिराजने वर्ल्ड कपमध्ये ९ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची इकनॉमी ५.२० इतकी आहे. मोहम्मद सिराजचा नवीन बॉलिंग पार्टनर असलेल्या जसप्रीत बुमराहनेही २ स्थानांनी उडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह हा चौथ्या स्थानी आहे. त्याचं रेटिंग ६८७ इतकं आहे. कुलदीप यादवनेही २ स्थानांनी झेप घेतली आहे. तो पाचव्या स्थानावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.