india vs australia  Saam tv news
Sports

World Cup 2023, Ind VS Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट? हवामानाचा अंदाज काय सांगतो?

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये भारत एकमेव संघ आहे ज्याला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

प्रविण वाकचौरे

Ind VS Aus :

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. मात्र भारताच्या पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट आहे. चेन्नईमध्ये काल जोरदार पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट फॅन्सची चिंता वाढली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारत एकमेव संघ आहे ज्याला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये पावसामुळे सराव सामने वाहून गेले होते. रिपोर्ट्सनुसार, चेन्नईतील सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळचे सराव सत्रही रद्द करावे लागले. अशा स्थितीत पावसाचा परिणाम सामन्यावर दिसून येऊ शकतो. (Latest Marathi News)

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईत दुपारी 2 वाजता सुरू होईल. त्याआधी अर्धा तास टॉस होणार आहे. Accuweather.com नुसार चेन्नईमध्ये दुपारी तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण असू शकते.

तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर आर्द्रता 70 च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून, त्यावेळी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के आहे. (World Cup 2023)

चेन्नईतील भारत-ऑस्ट्रेलियाचा इतिहास

नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया दोन संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, जी भारताने 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने चेन्नईमध्ये आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना गमावला आहे. तर चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2 आणि भारताने फक्त 1 सामना जिंकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT