World Cup 2023 Aus vs SL  X saam Tv
Sports

World Cup 2023 : कांगारूंकडून लंकेचं दहन; ५ विकेट राखत फडकवला विजयी ध्वज

World Cup 2023 Aus vs SL : लखनौमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघात झालेल्या सामन्यात लंकेचं पतन झालं.

Bharat Jadhav

World Cup 2023 Aus vs SL :

लखनौच्या इकाना स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. श्रीलंकेने दिलेल्या माफक 210 आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजी करत या वर्ल्डकपमधील पहिला विजय मिळवला. (Latest News)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील १४ वा सामना या दोन्ही संघांमध्ये झाला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या २०९ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही. श्रीलंकेकडून पथुम निसंकाने ६७ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार मारले. तर कुसल परेराने ८२ चेंडूंचा सामना करत ७८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार मारले.

तर कुसल परेराने ८२ चेंडूंचा सामना करत ७८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार मारले. या सामन्यातही फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व होते. फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. श्रीलंकेला कमी धावसंख्येत रोखण्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पाने महत्त्वाची भूमिका बजावली. झाम्पामुळेच चांगली सुरुवात करूनही श्रीलंकेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अॅडम झाम्पाने या सामन्यात ४७ धावांत ४ महत्त्वाचे बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT