ऑस्ट्रेलियाचा स्फोटक, अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जी खेळी केली याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. मॅक्सवेलने द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या हातून निसटलेला सामना जिंकून दाखवला. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र मॅक्सवेलची ही खेळी इतकी सहज आणि सोपी नव्हती. या खेळीदरम्यान मॅक्सवेलला दुखापतही झाली. आधी फिल्डिंग आणि नंतर बँटिंगसाठी मैदानात उतरलेल्या मॅक्सवेलला नंतर मैदानात उभं राहणं देखील कठीण बनलं होतं. एकीकडे अफगाणिस्तानची अटॅकिंग बॉलिंग लाईन आणि दुसरीकडे क्रॅम्प्सचा सामना मॅक्सवेलला करावा लागत होता. मात्र मैदानात उपस्थित चाहत्यांनी मॅक्सवेलला उत्तम साथ दिली. (Latest sports updates)
सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित चाहत्यांना मॅक्सवेलला आधार दिला. ऐरवी सचिन... सचिन.., विराट... विराट.. ने दुमदुमणाऱ्या वानखेडे मैदानात काल मॅक्सवेल... मॅक्सवेल... चा गजर ऐकू येत होता. हीच उर्जा होती जी मॅक्सवेलला साथ देत होती. म्हणून मैदानात आडवा झालेला मॅक्सवेल नव्या उमेदीने उठला आणि काम फत्ते करुनच मैदानाबाहेर गेला.
ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ मोठ्या अडचणीत होता. 100 धावांच्या आत संघाच्या 7 विकेट गेल्या होत्या. येथून ग्लेन मॅक्सवेलने डावाची धुरा सांभाळली आणि अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणला. मॅक्सवेलने अवघ्या 128 चेंडूत नाबाद 201 धावांची अप्रतिम खेळी केली.
या खेळीदरम्यान ग्लेन मॅक्सवेलला खूप संघर्ष करावा लागला. दरम्यान क्रॅम्प्समुळे ग्लेन मॅक्सवेलला खूप वेदना होत होत्या. कॅप्टन पॅट कमिंन्सने याला बाहेर जाण्याचा सल्ला देखील दिला होता. पण मॅक्सवेल शेवटपर्यंत ठाम राहिला आणि सामना संपवूनच मैदानाबाहेर आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.