afghanistan cricket team saam tv news
Sports

BAN vs AFG: WC मध्ये विजयाचा नारळ फुटेना! बांगलादेशकडून पराभूत होताच अफगाणिस्तानच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

World Cup 2023: या सामन्यातील पराभवानंतर अफगाणिस्तानच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Bangladesh vs Afghanistan:

वर्ल्डकप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. धर्मशाळेच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी १५७ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अफगाणिस्तानवर ६ गडी आणि ९२ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला आहे.

बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना नजमल हुसेन शांतोने ८३ चेंडूंचा सामना करत नाबाद ५९ धावांची खेळी केली. तर मेहदी हसनने ७३ चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेश संघाने एकहाती विजय मिळवला आहे.

अफगाणिस्तानने केल्या १५६ धावा..

अफगाणिस्तान संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रहमनुल्लाह गुरबाज ४७ धावांची खेळी करत दमदार सुरूवात करून दिली होती. तर इब्राहिम जदरानने २२ धावांचं योगदान दिलं.

या दोघांमध्ये ४७ धावांची भागीदारी झाली.मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकून धावा करू शकला नाही. अजमतुल्ला उमरझाईने २२ धावा केल्या. तर रहमत शाहने १८ आणि हसमतुल्लाह शाहिदीने १८ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

अफगाणिस्तानच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद...

अफगाणिस्तानचा हा वर्ल्डकप स्पर्धेतील सलग १३ वा पराभवा ठरला आहे. अफगाणिस्तानने २०१५ वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून ते आतापर्यंत १३ सामने गमावले आहेत. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

तर सलग १८ पराभवांसह झिम्बाब्वेचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. स्कॉटलँडने या स्पर्धेत सलग १४ सामने गमावले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT