4x400 Meter Final: Twitter
Sports

World Athletics Championships: भारतीय पोरांचं जग जिंकण्याचं स्वप्न हुकलं! 4x400 इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताच्या पदरी निराशा

4x400 Meter Final: पुरुषांच्या 4x400 रिले धावण्याच्या स्पर्धेत भारतचं पदक मिळवण्याचं स्वप्नं हुकलं आहे. भारताचा संघ अंतिम फेरीत पाचव्या स्थानी राहिला.

Ankush Dhavre

World Athletics Championships 4x400 Meter Final Result:

वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकले आहेत. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याने भालाफेक इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

तर पुरुषांच्या 4x400 रिले धावण्याच्या स्पर्धेत भारतचं पदक मिळवण्याचं स्वप्नं हुकलं आहे. भारताचा संघ अंतिम फेरीत पाचव्या स्थानी राहिला.

भारताकडून अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनस याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत ही शर्यत पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला ५९.९२ सेकंदाचा अवधी लागला.

पुरुषांच्या ४*१०० धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या संघाने विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. या संघाने ही शर्यत २ मिनिट ५७:३१ सेकंदात पूर्ण केली आहे. फ्रान्सने रौप्य पदक जिंकत हे अंतर २ मिनिट ५८:४५ सेकंदात पूर्ण केलं आहे.

तर ब्रिटेनच्या संघाने हे अंतर २ मिनिट ५८.७१ सेकंदात पूर्ण केलं आहे. जमैकाचा संघ चौथ्या स्थानी तर भारताचा संघ पाचव्या स्थानी राहिला.

भारतीय संघाने ४००० मीटर रिले धावण्याच्या स्पर्धेतील पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी इतिहासाला गवसणी घालत पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी हे अंतर २ मिनिट ५९.०५ सेकंदात पूर्ण केलं होतं. यासह भारतीय खेळाडूंनी आशियाई विक्रम मोडून काढला होता. यापूर्वी विक्रम २ मिनिट ५९:५१ सेकंद इतका होता. (Latest sports updates)

भारतीय धावपटू पारुल चौधरीने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ११ व्या स्थानी मजल मारली आहे. तर भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

त्याने ८८.१७ मीटर लांब भाला फेकून हे पदक जिंकले आहे. हे खेळाडू २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT