WPL  Saam tv
Sports

पुन्हा एकदा विजयाची झळाळी! RCB दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन; चौथ्यांदा दिल्लीचं स्वप्न भंगलं, फायनल हातातून निसटलं

WPL 2026 champions Delhi Capitals: महिला प्रीमियर लीग २०२६ च्या चौथ्या हंगामाचं आरजीबीने विजेतपद जिंकलं आहे. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली

Vishal Gangurde

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आरसीबीचा डंका

आरसीबीने कोरलं जेतेपदावर नाव

आरसीबीने स्पर्धेत दुसऱ्यांदा कमाल केली

महिला प्रीमियर लीग २०२६ च्या विजेतेपदावर आरसीबीने नाव कोरलं आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना पार पडला. महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात विजेता होण्याचं आरसीबीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. आरसीबीने विजेतपद जिंकून नवा इतिहास रचला आहे. आरसीबीने कप जिंकल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात आज वडोदरा येथील कोटांबी येथील बीसीए स्टेडियमवर डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये जेतेपदासाठी सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर २०४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

दिल्ली कॅपिटल्सकडून लिझेलने ३० चेंडूत ३७ धावा केल्या. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने अर्धशतक झळकावले. वुल्फार्टनेही शेवटी आक्रमक फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना एक अग्निपरीक्षा होती. कारण ते सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचले होते. मागील तीन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

रॉयल बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदराच्या कोटाम्बीमध्ये बीसीए स्टेडियमवर WPL 2026 च्या हंगामाचा फायनल सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा ठरला. आरसीबीने दिल्लीला 6 विकेट्सने पराभूत केले. आरसीबीच्या आक्रमक फलंदाजीमुळे यंदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने शानदार 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा कुटल्या. यामुळे सलग चार वेळा अंतिम सामन्यात पोहोचलेल्या दिल्लीच्या संघाचे विजयाचं स्वप्न भंगले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ

Virar: पोहण्यासाठी तलावात उडी मारली, परत बाहेर आलाच नाही; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT