team india twitter
Sports

Team India Victory Parade: चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाची विजयी परेड निघणार का? मोठी अपडेट आली समोर

Team India Victory Parade News: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान भारतात परतल्यानंतर विजयी परेड निघणार का? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील विजेता संघ ठरला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा या स्पर्धेतील जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.

ही ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाला १२ वर्ष वाट पाहावी लागली. यापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील जेतेपदाची ट्रॉफी जिंकली होती. आता रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हा कारनामा करून दाखवला आहे.

या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर पुन्हा एकदा विजयी परेड काढली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आता मोठी अपडेट समोर येत आहे.

भारतीय संघाने आयसीसी टी २० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर, जोरदार जल्लोष करण्यात आला होता. भारतीय खेळाडू आधी दिल्लीला गेले त्यानंतर जेव्हा मुंबईत आले त्यावेळी भव्य विजयी परेड काढण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये लाखो क्रिकेट फॅन्सने सहभाग घेतला होता. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचं असं भव्य स्वागत केलं जाणार नाहीये. सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

काय आहे कारण?

भारताने १२ वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे भव्य स्वागत होणार असं वाटलं होतं. मात्र असं काहीच झालेलं नाही. यामागचं सर्वात मोठं करण IPL स्पर्धा असू शकतं. कारण येत्या २२ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल स्पर्धेत अवघ्या १२ दिवसांचा गॅप आहे.

त्यामुळे खेळाडूंना आपल्या संघाचा ट्रेनिंग कॅम्प जॉइन करण्यापूर्वी विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असावा. दुसरं प्रमुख कारण म्हणजे, वर्ल्डकप स्पर्धा जिंकणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून विजयी परेड काढली तर वर्ल्डकप परेडचं महत्व कमी होऊ शकतं. याच कारणामुळे विजयी परेड काढली नसावी.

भारतीय संघाचा भाग असलेले खेळाडू काही दिवस विश्रांती करतील. त्यानंतर आपल्या फ्रेंचायझीसोबत आयपीएल २०२५ स्पर्धेच्या सरावाला सुरुवात करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT