Rohit Sharma on Suryakumar Yadav: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम वनडे सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडला.
या सामन्या भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे. दरम्यान या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादवबद्दल कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.
सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,'ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे की, सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या मालिकेत केवळ २ ३ चेंडू खेळू शकला. तो चांगल्या चेंडूंवर बाद झाला. मात्र आज तो चुकिचा शॉट खेळून बाद झाला. आम्हाला चांगलच माहित आहे की, तो फिरकी गोलंदाजांविरुध्द चांगली कामगिरी करतो. त्यामुळे आम्ही त्याला शेवटच्या १५ षटकांसाठी थांबवून ठेवलं होतं.' (Latest sports updates)
तसेच तो पुढे म्हणाला की, 'अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. आम्हाला माहितेय तो क्वालिटी प्लेयर आहे. फक्त त्याची वेळ खराब सुरु आहे. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये चौथ्या क्रमकांवर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र तो एष्टन एगरच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.१ षटकात २४८ धावांवर संपुष्ठात आला.
विराट कोहलीची ५४ आणि हार्दिक पंड्याची ४० धावांची खेळी वगळली,तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.