Rohit Sharma Play Against RCB saam tv
Sports

Rohit Sharma: आरसीबीविरूद्ध रोहित शर्मा खेळणार का? हिटमॅनच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर

MI vs RCB IPL 2025: आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार असून, या सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत अपडेट समोर आलं आहे. टीमचा कोच महेला जयवर्धने याने रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

रोहितच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट

रोहित शर्माच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे. एक्स वर करण्यात आलेल्या एका ट्विटनुसार, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक जयवर्धने म्हणाले, "रोहितची परिस्थिती चांगली असल्याचं दिसतंय. त्याने प्रॅक्टिसमध्येही फलंदाजी केली." दरम्यान त्यामुळे रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

रोहितला लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धचा सामना खेळता आला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, सरावादरम्यान त्याला दुखापत झाली होती. रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पण आता तो आरसीबीविरुद्ध मैदानात उतरू शकतो. आज संध्याकाळी या दोन्ही टीम्स एकमेकांसमोर भिडणार आहेत.

कोणाला मिळणार बाहेरचा रस्ता?

जर रोहितने मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केलं तर एका खेळाडूला वगळण्यात येऊ शकतं. यावेळी राज बावा किंवा विल जॅक्स या दोघांपैकी एकाला टीमबाहेर जावं लागू शकतं. विल जॅक्सने या सिझनमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. पण त्याला काही फारशी विशेष कामगिरी करता आली नाही. लखनऊविरुद्ध फक्त ५ रन्स करून जॅक आऊट झाला.

रोहितची बॅट यंदाच्या आयपीएलमध्ये शांतच

रोहित शर्माने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही. या सिझनमधील पहिल्या सामन्यात तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यानंतर, गुजरात टायटन्सविरुद्ध ८ रन्स काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही रोहितला काही खास कामगिरी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT