Arjun Tendulkar IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 203) १६ वा हंगाम जोमात सुरू झाला आहे. स्पर्धेत एकापेक्षा एक असे रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात कोणताही संघ दुबळा दिसत नाहीये, त्यामुळे स्पर्धेत प्रत्येक सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. मुंबईचा सलग दोन सामन्यात पराभव झाला आहे. (Latest sports updates)
मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना विराट कोहलीच्या आरसीबी संघाविरुद्ध खेळला होता. नेहमीप्रमाणेच यंदाच्या हंगामातही मुंबईने पहिला सामना गमावला. यासह मुंबईने २०१३ पासूनची पहिल्या सामन्यातील पराभवाची परंपरा कायम ठेवली. मात्र, पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईविरोधात (Chennai Super Kings) घरच्या मैदानावर झालेला सामना देखील मुंबईने गमावला.
त्यामुळे पहिला सामना देवाला म्हणणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. रोहित शर्माने निवडलेली प्लेईंग-११ अजिबात चांगली नव्हती. "रोहितने अष्टपैलू अर्जुन तेंडूलकरला संधी द्यायला हवी, तो मॅचविनर खेळाडू आहे. मुंबईच्या मैदानावर खेळण्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे, येत्या सामन्यात अर्जूनला संधी द्या आणि पराभवाचा हॅट्रिक टाळा", असा सल्ला चाहत्यांनी मुंबई इंडियन्ससह कर्णधार रोहित शर्माला दिला आहे.
मुंबई इंडियन्स टीमचा मेन्टॉर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जून तेंडूलकर याला मुंबईने २० लाखांच्या बेस प्राईसमध्ये विकत घेतले होते. मात्र, अर्जून हा गेल्या २ वर्षांपासून पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. अर्जूनचं आयपीएलमधील मुंबई इंडियन्ससाठीचं हे तिसरं वर्ष आहे. मात्र त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात अर्जूनला संधी मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शनिवारी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं चेन्नईसमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांना विस्फोटक फलंदाजी केली.
सलामीवीर डेवॉन कॉनवे पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अजिक्यने २७ चेंडून ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईवर ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.