MS Dhoni  saam tv
Sports

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

MS Dhoni Injury Update : महेंद्रसिंग धोनी सध्या दुखापतीमुळं आयपीएलमध्ये खेळत नाही. मागील सामन्यात तो मैदानात उतरू शकतो, असं वृत्त होतं. आता पुढच्या सामन्यात धोनी खेळणार का? वृत्तानुसार १६ एप्रिलला धोनी मोठा निर्णय घेऊ शकतो.

Nandkumar Joshi

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्याच्या घडीला तरी संकटात आहे. पाचपैकी तीन सामन्यांत चेन्नईला पराभवाचं तोंड बघायला लागलंय. क्रिकेटमधील चाणक्य समजला जाणारा महेंद्रसिंग धोनीची संघाला नितांत गरज आहे. अशावेळी दुखापतीमुळं तो संघाच्या बाहेर आहे. दुखापतीमुळं त्रस्त असलेला धोनी आता सर्वाधिक आवश्यकता असतानाच मोठा निर्णय घेऊ शकतो, असं वृत्त येऊन धडकलंय.

रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनी १६ एप्रिलला म्हणजेच उद्याच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील पुढील सामना खेळणार की नाही, यासंबंधी हा निर्णय होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. १८ एप्रिलला हैदराबादमध्ये हा सामना होईल. धोनी या सामन्यात खेळू शकतो का? हैदराबादमध्ये त्याच्या आयपीएल पर्वाची सुरुवात होणार का? धोनीला पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या, १६ एप्रिलला मिळण्याची शक्यता आहे.

RevSportz च्या रिपोर्टनुसार, धोनी १६ एप्रिल रोजी सकाळी हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. या निर्णयानं तो सामना खेळणार की नाही यावरील प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. जर धोनीनं संघासोबत हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला तर, तो सामनाही खेळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतला तर, तो १८ एप्रिलला होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही, असेच दिसते.

दुखापतीमुळं धोनी संघाबाहेर

दुखापतीमुळं धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकलेला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी धोनी चेन्नईत लक्ष केंद्रीत करत आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली धोनी रिहॅबिलिटेशन करत आहे. वृत्तानुसार, धोनी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण पाच सामने खेळले आहेत. एकाही सामन्यात धोनी खेळलेला नाही. या पाचपैकी तीन सामन्यांत चेन्नईला पराभूत व्हावे लागले आहे.

तत्पूर्वी धोनी १४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळेल, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. पण कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली तेव्हा त्यात धोनीचं नाव नव्हतं. त्यामुळं चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली. आता १६ एप्रिलला धोनी काय निर्णय घेतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

SCROLL FOR NEXT