WI vs SA,Highlights: दक्षिण आफ्रिकेचा यजमान वेस्टइंडिजला दणका!सलग सातव्या विजयासह सेमिफायनलमध्ये प्रवेश
south africa cricket team twitter/icc
क्रीडा | T20 WC

WI vs SA,Highlights: दक्षिण आफ्रिकेचा यजमान वेस्टइंडिजला दणका!सलग सातव्या विजयासह सेमिफायनलमध्ये प्रवेश

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत सामना वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. अँटिग्वामध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजने २० षटकअखेर ८ गडी बाद १३६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या. मात्र पावसाने अडथळा निर्माण केल्याने दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७ षटकात १२३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ गडी राखून विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या. मात्र पावसाने हजेरी लावल्याने हे आव्हान कमी करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार, १२३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचे गोलंदाज चमकले तर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकेकडून स्टब्सने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली.

तर हेनरिक क्लासेनने २२ धावा करत दक्षिण आफ्रिकेला संघात कमबॅक करुन दिलं. वेस्टइंडिजने या सामन्यावर पकड बनवून ठेवली होती. वेस्टइंडिजकडून चेजने महत्वाचे ३ गडी बाद केले. वेस्टइंडिजच्या गोलंदाजांनी सामना खेचून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ५ धावा करायच्या होत्या. शेवटी मार्को यान्सेनने षटकार खेचला आणि संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजने २० षटकअखेर ८ गडी बाद १३५ धावा केल्या. या सामन्यात काईल मेयर्स आणि शाई होप यांची जोडी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. होप शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर काईल मेयर्सने ३५ धावांची खेळी केली.

निकोलस पूरन या सामन्यात केवळ १ धाव करत माघारी परतला. रोस्टन चेज फलंदाजीत आणि गोलंदाजीत चमकला. त्याने प्रथम फलंदाजी करताना ४२ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५२ धावांची निर्णायक खेळी केली. ही निर्णायक खेळी त्याने त्यावेळी केली, ज्यावेळी वेस्टइंडिजचा संघ अडचणीत होता. शेवटी आंद्रे रसेलने ९ चेंडूंचा सामना करत १५ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organic Butter Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा ऑर्गेनिक बटर

Mumbai Rain Alert : मुंबई-पुण्यासाठी पुढील 3-4 तास महत्वाचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Shivani Sonar: परी म्हणू की सुंदरा;शिवानी सोनरची दिलखेचक अदा

VIDEO: अमरावतीत ४ मुलांना अन्नातून विषबाधा, आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरु

Nilesh Lanke: दूध,कांदा दरवाढीसाठी मविआचं आंदोलन; लंकेंचे कार्यकर्ते आणि पोलिस भिडले!

SCROLL FOR NEXT