WI vs PAK
WI vs PAK Saam Tv
क्रीडा | IPL

WI vs PAK: रोमांचक सामन्यात विंडीजने पाकिस्तानला चारली धूळ

वृत्तसंस्था

केमार रोचच्या (Kemar Roach) धडाकेबाज खेळीमुळे वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 1 विकेटने रोमहर्षक सामन्यात पराभूत केले. केमार रोचच्या खेळीने वेस्ट इंडिजने (WI vs IND) रविवारी सबिना पार्क येथे दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर एक विकेटने शानदार विजय मिळवला. या विजयासह, विंडीजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत महत्त्वपूर्ण गुणांची भर घातली आहे.

पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी 168 धावांची गरज होती. पण संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. 16 धावांवर तीन विकेट पडल्या. क्रेग ब्रेथवेट (2), किरन पॉवेल (4), आणि नकरुमाह बॉनर (5) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर रोस्टन चेस आणि जर्मेन ब्लॅकवुडने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.

फहीम अशरफने पुन्हा वेस्ट इंडिजला धक्का दिला आणि रोस्टन चेसला बळी घेऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. एका वेळी यजमान 142/8 वर होते आणि त्यांना विजयासाठी 26 धावांची गरज होती. तथापि, अखेरीस रोचने स्वत:च्या खेळीत सातत्य ठेवले आणि विंडीजने एका विकेटने विजय मिळवला.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज संघाने जेडेन सीलच्या पाच विकेटच्या मदतीने पाकिस्तानला 203 धावांवर गुंडाळले. बाबर आझमने पाकिस्तानकडून सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानने 203 धावा केल्या, तर वेस्ट इंडिज संघाने 253 धावा केल्या. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जेडेन सील्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

SCROLL FOR NEXT